पोटात गॅस झाला नसेल तरी फुगल्यासारखं का वाटतं?

पोटात गॅस झाला नसेल तरी फुगल्यासारखं का वाटतं?

पोट (stomach) फुगलं की पोटात गॅस झाला असंच वाटतं. मात्र पोटात गॅस होणं हे पोटफुगीचं एकमेव कारण नाही.

  • Last Updated: Nov 23, 2020 11:15 PM IST
  • Share this:

पोटात (stomach) गॅस तयार झाल्यामुळे बहुतेक लोकांना पोट फुलण्याची समस्या उद्भवते. मात्र पोट फुलण्याचे कारण केवळ गॅस किंवा आंबटपणाच नसतं तर त्याचं एक कारण पित्ताशयात सूज देखील असू शकतं, ज्याला कोलिसिस्टाइटिस म्हणतात. पित्ताशयात सूज उद्भवते कारण पित्ताशयात पित्त रस अडकतो आणि त्यामुळे पित्ताशयात खडे निर्माण होण्यात सुरुवात होते. यामुळे पित्ताशय वाहिका ज्या नळीच्या आकाराचा असतात, त्या बंद होतात. या पित्ताशयाच्या आत आणि बाहेर सर्व पदार्थ हलवण्याचे कार्य करत असतात. दगडांमुळे या पित्तवाहिका बंद होतात आणि त्यामुळे पित्ताशयात पित्त रस जमा होऊ लागतो. ज्यामुळे दबाव वाढतो. पित्ताशयात सूज येण्याच्या समस्येचं हेच कारण आहे.

पित्ताशयातील सुजेची कारणं

myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांच्या मते, पित्ताशयात सूज येण्याची समस्या लठ्ठपणामुळे किंवा गर्भधारणेदरम्यान होऊ शकते. या व्यतिरिक्त संप्रेरक थेरपी घेतल्यासही ही समस्या उद्भवू शकते. पित्ताशयात सूज येण्याची पुष्कळ कारणे असू शकतातं. यकृतातील कोणत्याही प्रकारच्या ट्युमरमुळे पित्ताशय वहिका बंद होते किंवा एखादा गंभीर रोग झाल्यास रक्तवाहिन्या खराब होतात आणि पित्ताशयामध्ये पुरेसे रक्त नसते यामुळे पित्ताशयामध्ये सूज निर्माण होते. तसंच जेव्हा पित्ताशयामध्ये पुरेसे रक्त नसेल आणि जर त्या व्यक्तीस मधुमेहाचा त्रास असेल तरीदेखील पित्ताशयामध्ये सूज येण्याची समस्या रुग्णाला होऊ शकते. पित्ताशयाची सूज पित्ताशयावरील संक्रमण, ओटीपोटात दुखापत, संक्रमण, दुर्बल प्रतिरक्षा प्रणाली किंवा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे देखील होऊ शकतं.

काय आहेत पित्ताशयातील सुजेची लक्षणं

त्वचेचा रंग आणि डोळ्यातील पांढऱ्या भागाचा रंग बदलणं, भूक न लागणं, उलट्या होणं, थंडी वाजणं इत्यादी सर्व लक्षणं पित्ताशयामध्ये सूज आल्यामुळे दिसू शकतात. या लक्षणांसह जर पोटात खूप वेदना होत असतील तर आपण ताबडतोब डॉक्टरकडे जावं.

कोलिसिस्टाइटिस म्हणजेच पित्ताशयाच्या समस्या टाळण्यासाठीचे उपाय

लठ्ठपणामुळे पित्ताशयामध्ये सूज येते त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी शरीरातील अधिक चरबी कमी करणं फार महत्त्वाचं आहे. चरबी नसलेले पदार्थ खा, नियमित व्यायाम करा आणि आहारात हिरव्या भाज्या असलेल्या सलाडचा समावेश करा. सकस आहार आणि नियमित व्यायाम करणं शरीराला कोणत्याही समस्येपासून वाचवण्याचा योग्य मार्ग आहे.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - पोटफुगीचीकारणेआणि घरगुती उपाय...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 23, 2020, 11:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading