मुंबई, 29 जानेवारी : पुरुषांनी आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी चांगल्या पिकअप लाइन्स वापरलेल्या स्त्रियांना आवडतात. त्या कदाचित हे मान्य करणार नाहीत; पण त्यांना अशा क्रिएटिव्ह पिकअप लाइन्स खूप आवडतात. ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर संवाद सुरू करताना महिलांचं लक्ष वेधून घेणाऱ्या पिकअप लाइन्स वापरणं खूप महत्त्वाचं असतं.
‘तू कशी आहेस?’ हा नेहमीचाच जुना डायलॉग खूप नीरस आणि कंटाळवाणा वाटू शकतो. संवाद साधताना कितीही इंटरेस्ट असला तरी तुमचं पहिलं इम्प्रेशन खूप महत्त्वाचं असतं. कारण, त्यातून तुम्ही नवीन नात्याची सुरुवात कशी करता हे ठरत असतं. संवाद सुरू करताना प्रभाव पडण्यासाठी असलेला सर्वोत्तम मार्ग म्हणजे पिकअप लाइन. तुमची पिकअप लाइन काय आहे आणि तिचं समोरच्या व्यक्तीवर कसं इम्प्रेशन पडतं, ते खूप महत्त्वाचं असतं. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलंय.
जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला प्रथमच इम्प्रेस करण्यासाठी संवादाची सुरुवात करता, तेव्हा कोणत्या पिकअप लाइन्स वापरता येतील, हे पाहू या. कारण त्यातूनच नात्याची सुरुवात होऊ शकते. पुढे कितीही बोलणं झालं, तरी सुरुवातीला पडलेला प्रभाव कायम टिकून राहतो. त्यासाठी काही खास पिकअप लाइन्स जाणून घेऊ या.
- मी हरवलो आहे. तुम्ही मला तुमच्या हृदयाची दिशा देऊ शकता का?
- असं म्हणतात, की डिस्ने वर्ल्ड हे पृथ्वीवरचं सर्वांत आनंदी ठिकाण आहे; पण नक्कीच ते कधीही तुझ्यासमोर उभे राहिले नसतील.
- तू सिरी आहेस का? कारण तू मला autocomplete करतेस.
- तुझे आई-वडील बेकर्स आहेत का? कारण तू क्युटी पाय आहेस.
- जेव्हा तू स्वर्गातून पडलीस, तेव्हा तुला लागलं होतं का?
- जर मला अल्फाबेट्सची पुनर्रचना करता आली तर मी "U" आणि "I" एकत्र ठेवेन.
- तू फळ असतीस, तर तू फाइन-अॅपल असली असतीस.
- तुझं काही नाव आहे का? की मी तुला माझं म्हणू?
- मी तुझा फोन घेऊ शकतो का? मला देवाला फोन करायचा आहे आणि तुझी हरवलेली एंजल, परी मला सापडली आहे, असं सांगायचं आहे.
- मला वाटतं की माझ्या फोनमध्ये काही तरी बिघाड झाला आहे. तू त्यावर फोन करून तो चालतोय की नाही ते पाहशील का?
- तू खूप छान आहेस, तू मला माझी पिकअप लाइन विसरायला लावलीस.
- मला वाटतं, की तुझ्यात कदाचित 'Vitamin Me'ची कमतरता असेल.
- तू कीबोर्ड आहेस का? कारण तू माझ्या टाइपची आहेस असं वाटतंय.
- आपण सॉक्स नाहीत; पण आपण खूप चांगली जोडी बनवू शकू.
- सुंदर असणं हा गुन्हा असता, तर तू त्या आरोपाखाली दोषी ठरली असती.
- आपण कधी भेटलोय का? कारण तू माझ्या पुढच्या पार्टनरसारखी दिसतेस.
- तुझं फेव्हरिट ड्रिंक कोणतं आहे? जेव्हा आपण आपल्या पहिल्या डेटवर जाऊ तेव्हा तुझ्यासाठी कोणतं ड्रिंक आणायचं, यासाठी मी हे विचारत आहे.
- तू मला एक ड्रिंक देणं लागतेस. कारण जेव्हा मी तुला पाहिलं, तेव्हा माझ्या हातातलं ड्रिंक खाली पडलं.
- जरा ताजी हवा घेण्यासाठी बाहेर जायचं आहे का? कारण तू माझा श्वास काढून घेतलास.
- तू टाइम ट्रॅव्हलर आहेस का? कारण मी तुला माझ्या भविष्यात पाहतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.