Home /News /lifestyle /

एक महिना दारूपासून लांब राहा, शरीरात होतील ‘हे’ बदल

एक महिना दारूपासून लांब राहा, शरीरात होतील ‘हे’ बदल

एक महिन्यासाठी दारु सोडली तर शरीर पूर्णपणे बदलून जातं (Quit Alcohol for 1 month) असा दावा प्रायरी ग्रुपच्या तज्ज्ञांनी केला आहे.

    मुंबई, 6 जानेवारी : दारु पिणं आरोग्यासाठी वाईट असतं (Alcohol Side Effects) असं नेहमी म्हटलं जातं. मात्र दारु पिणारे याकडे साफ दुर्लक्ष करतात. उलट दारु पिणारे तुम्हाला दारु पिण्याचे फायदेच सांगतील पण त्यामुळे काय नुकसान होतं याकडे अजिबात लक्ष देणार नाहीत. मात्र रोज दारु पिणाऱ्यांनी एक महिना जर प्यायली नाही (Effect of quitting alcohol for 1 month) तर त्यांच्या तब्येतीमध्ये खूप फरक पडतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. एक महिन्यासाठी दारु सोडली तर शरीर पूर्णपणे बदलून जातं (Quit Alcohol for 1 month) असा दावा प्रायरी ग्रुपच्या तज्ज्ञांनी केला आहे. ‘ड्राय जानेवारी’ (Dry January) या मोहिमेअंतर्गत हा खुलासा करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत दरवर्षी जानेवारी महिन्यात दारु न पिण्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येते. युरोप आणि अमेरिकेत हा उपक्रम जास्त प्रमाणात राबवला जातो. पहिला आठवडा रोज दारु पिण्याची सवय असणाऱ्यांना पहिला आठवडा जरा कठीणच जाण्याची शक्यता आहे. कदाचित ते पुन्हा दारु प्यायला लागतील. दारु पिण्याच्या इच्छेला कंट्रोल करणं अत्यंत अवघड असतं. एक आठवडा दारु प्यायला नाहीत तर मात्र त्यांची झोप आणि आणि झोपेची वेळ यात नक्की फरक पडेल. दारु प्यायलानं झोप लवकर लागते. मात्र दारु सोडल्यानंतर झोप लागण्यात त्रास होईल. पण जेव्हा झोप लागेल तेव्हा ती शांत आणि गाढ (Sound Sleep) झोप असेल. एका आठवड्यानंतर तुमचं शरीरही जास्त हायड्रेटेड (Body Hyderated After Quitting Alcohol) असल्याचं जाणवेल. वाईनचे सहा ग्लास पिण्यापेक्षा शरीरात 19-20 ग्लास पाणी सहज शोषलं जातं. इतकंच नाही तर जंक फूडही कमी खाल्लं जाईल आणि खाण्याच्या पद्धतीतही बदल होईल असाही दावा करण्यात आला आहे. वाचा : दारू प्यायल्याने झोपेवर होतो परिणाम, पडतात विचित्र स्वप्नं? तज्ज्ञांनी केला खळबळजनक दावा दुसरा आठवडा दोन आठवड्यापर्यंत जर तुम्ही दारुपासून लांब राहिलात तर चांगली झोप आणि शरीर हायड्रेट (Hydrate) राहण्याचे परिणाम दिसू लागतील. तुम्हाला आतूनच उत्साही वाटू लागेल. तुमच्या त्वचेवर सूज येत असेल तर ती येणार नाही. तुमची त्वचाही चांगली दिसू लागेल. गॅस किंवा ॲसिडीटीचा (Acidity) त्रासही दोन आठवड्यांत बरा होईल. तिसरा आठवडा तिसऱ्या आठवड्यापर्यंत दारुपासून लांब राहू शकलात तर आणखी चांगले परिणाम दिसतील. तुमचं ब्लडप्रेशर कमी होऊ लागेल आणि स्थिर राहील. इतकंच नाही तुमच्या बऱ्याच कॅलरीजही कमी होतील. तुम्ही बारीक तर व्हालच पण फिटही व्हाल. सहा ग्लास वाईनमधून माणसाच्या शरीरात 3000 कॅलरी जातात. वाचा : दारूची सवय सोडायची? हे 4 उपाय नक्की वाचा, होईल फायदा! चौथा आठवडा चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमची त्वचा एकदम स्वच्छ होईल. पहिल्यापेक्षा ती अधिक चांगली दिसू लागेल. चेहऱ्यावरून ॲक्ने आणि कोरडेपणा जाईल. इतकंच नाही तर तुम्ही जर रोज दारु पित असाल आणि एक महिनाभर तुम्ही दारुपासून लांब राहिलात तर तुमचे बरेच पैसे वाचतील. तुमचा मूडही चांगला होईल आणि तुम्हाला उत्साही वाटू लागेल, शरीरात जास्त एनर्जी असल्याचं जाणवेल. तेव्हा जर तुम्ही रोज दारु पित असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही, किमान एक महिनाभर दारुपासून लांब राहण्याचा निश्चय करा. कदाचित तुमची ही सवय कायमची जाईल.
    First published:

    Tags: Health, Liquor stock

    पुढील बातम्या