कित्येक वर्षांपूर्वी दिले होते 500 रुपये; BANK CEO झालेल्या विद्यार्थ्याने परत दिले 30 लाखांचे शेअर्स

कित्येक वर्षांपूर्वी दिले होते 500 रुपये; BANK CEO झालेल्या विद्यार्थ्याने परत दिले 30 लाखांचे शेअर्स

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC First bank) सीईओ आणि एमडी व्ही. वैद्यनाथन (V. Vaidyanathan) यांनी आपले शिक्षक गुरदयाल सैनी (Gurdial Saini) यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानलेत.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : आपल्या आयुष्यात आईनंतर दुसरा गुरू असतो तो म्हणजे शिक्षक (teacher). शिक्षकांचे आभार मानण्याचा किंवा शिक्षकांप्रती आदर दाखवण्याचा आपणा सर्वांसाठीचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. तोदेखील शाळा, कॉलेजमध्ये असेपर्यंत आपण साजरा करतो. जसजसं आपण आयुष्यात पुढे जातो यशाची शिखरं चढू लागतो, तसतसं अनेकांना या शिक्षकाचा विसर पडतो. मात्र एका बँकेच्या सीईओने आपल्या कठीण परिस्थितीत आपल्यासाठी उभं राहून आपल्याला मदत करणाऱ्या शिक्षकाला आजही विसरला नाही. इतक्या वर्षांनंतर त्या शिक्षकाशी संपर्क होताच त्यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC First bank) सीईओ आणि एमडी व्ही. वैद्यनाथन (V. Vaidyanathan) यांनी आपले शिक्षक गुरदयाल सैनी (Gurdial Saini) यांना 30 लाख रुपयांचे शेअर दिले आहेत. कित्येक वर्षांपूर्वी गुरुदयाल यांनी वैद्यनाथन यांना 500 रुपये दिले होते आणि त्याबदल्यात आभार मानण्यासाठी वैद्यनाथन यांनी आपल्या शिक्षकाला अनोखं असं गिफ्ट दिलं आहे. या गुरुशिष्याची कहाणी एका फेसबुक युझरने पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, वैद्यनाथन त्यावेळी चेन्नईत राहत होते. मेसरातील बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्यांना तिथं जाऊन मुलाखत द्यायची होती. मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांना गणित शिकवणारे शिक्षक गुरदयाल सैनी यांनी त्यांना 500 रुपये दिले. वैद्यनाथन यांना त्या इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश मिळाला, त्यांनी आपला कोर्सही पूर्ण केला. त्यानंतर सैनी यांचे पैसे परत देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी वैद्यनाथन यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनी यांनी काम सोडलं होतं.

हे वाचा - आवाजावरूनच ओळखतो व्यक्ती; अंधत्वावर मात केलेल्या टेलिफोन ऑपरेटरचे मंत्रीही फॅन

खूप वर्षांनी वैद्यनाथन यांना एका जुन्या सहकाऱ्याकडून सैनी यांचा पत्ता समजला. ते आग्रामध्ये राहत असल्याचं कळलं आणि मग वैद्यनाथन यांनी त्यांच्या नावे लाखोंचे शेअर करून आभार मानले.

याच महिन्यात आयडीएमसी फर्स्ट बँकेने स्टॉक एक्सचेंजमध्ये एक रेग्युलेटरी फाइल केली आहे. ज्यामध्ये वैद्यनाथन यांनी एक लाख इक्विटी शेअर सैनी यांच्या नावावर केल्याचं नमूद केलं आहे. ज्यांची आताची किंमत 30 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. नोटिसीत म्हटलं आहे. "व्ही वैद्यनाथन यांनी IFDC फर्स्ट बँक लिमिटेडमधील आपले  1,00,00 शेअर आपले शिक्षक गुरदयाल स्‍वरूप सैनी यांना ट्रान्सफर केले आहेत. कोणत्याही अटींशिवाय एक गिफ्ट म्हणून त्यांनी हे शेअर दिले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला त्यांच्या गुरूने केलेल्या मदतीचे त्यांनी आभार मानले आहेत"

हे वाचा - 80 वर्षीय आई-वडिलांना मुलांनी सोडलं, पोट भरण्यासाठी त्यांनी सुरू केला 'बाबा का ढाबा'; VIDEO VIRAL

सोशल मीडियावर वैद्यनाथन यांचं खूप कौतुक होतं आहे. हे खरे गुरू-शिष्याची परंपरा आहेत, जे आता खूप दुर्मिळरित्या दिसून येतं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: October 8, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या