नवी दिल्ली, 17 जानेवारी : रक्तदाब हा जीवनशैली आणि खाण्याच्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींनी उद्भवणारा आजार आहे. हल्ली लोक लहान वयातच याला बळी पडत आहेत. भारतात रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्याची बाब केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सनं नुकत्याच दिलेल्या अहवालात समोर आली आहे, अशी बातमी
जागरणनं दिली आहे.
रक्तदाब वाढणं आणि कमी होणं दोन्ही धोकादायक आहेत. उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी सतर्क असतात. परंतु, कमी रक्तदाब असलेले रुग्ण या स्थितीकडे दुर्लक्ष करतात. यामुळं काहीवेळा घातक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाचा जितका धोका असतो, तितकाच तो कमी रक्तदाबापासूनही (Low Blood Pressure) असतो. जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, शरीरातील रोगाची लक्षणं ओळखून रक्तदाब सामान्य व्हावा, यासाठी घरचा आहार घ्या. शरीरातील कमी रक्तदाबाची लक्षणं कशी ओळखायची, ते जाणून घेऊया.
चक्कर येणं
तुमचा रक्तदाब कमी होत असेल, तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. जर तुम्हाला असा त्रास सतत होत असेल तर, लगेच डॉक्टरांना भेटा आणि त्यावर उपाय किंवा उपचार करून घ्या.
बेशुद्ध होणं
ज्या लोकांना रक्तदाब कमी आहे ते बेशुद्ध होऊ शकतात. जर तुम्हालाही स्वतःमध्ये अशी लक्षणं जाणवत असतील, तर ताबडतोब रक्तदाब तपासा आणि ताबडतोब उपचार करा.
धूसर दृष्टी
ज्या लोकांचा रक्तदाब कमी असतो, त्यांची दृष्टीही कमजोर होते. तुम्हालाही स्वतःमध्ये अशी लक्षणं जाणवत असतील, तर ताबडतोब सतर्क व्हा.
उलटी होणं
जेव्हा रक्तदाब कमी होतो, तेव्हा काही जणांना उलट्यांचा त्रास होतो. या लक्षणाकडेही दुर्लक्ष करू नका.
थकवा येणं
काम न करताही थकवा जाणवत असेल, तर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असू शकता.
हे वाचा -
Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र
एकाग्रता कमी होणं
कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना एकाग्र होण्यास त्रास होतो. हे लक्षण ओळखणं कधीकधी थोडं कठीण असतं.
श्वास घेण्यात अडचण:
कमी रक्तदाबाची समस्या असल्यास, श्वासोच्छवासाच्या गतीमध्येही बदल होतो. रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होतो. दम किंवा धाप लागू शकते.
बीपी कमी झाल्यावर लगेच काय खावं आणि प्यावं जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात येईल -
मिठाचं सेवन करा. मीठ खाल्ल्यानं लो बीपी नियंत्रित ठेवता येतो.
हे वाचा -
Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच
एका ग्लास पाण्यात लिंबू पिळून त्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि ते प्या.
रक्तदाब सामान्य करण्यासाठी, इलेक्ट्रॉलचं द्रावण तयार करा आणि ते प्या.
तुम्हाला लो बीपी नियंत्रणात आणायचा असेल तर, तुम्ही एक कप कॉफी पिऊ शकता.
चॉकलेट खाल्ल्यानं देखील तुमचा रक्तदाब नियंत्रित होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.