Home /News /lifestyle /

अरे देवा! कोरोनानंतर आता भारतावर आणखी एका चीनी व्हायरसचं संकट; ICMR ने केलं सावध

अरे देवा! कोरोनानंतर आता भारतावर आणखी एका चीनी व्हायरसचं संकट; ICMR ने केलं सावध

चीन आणि व्हिएतनाममध्ये Cat Que Virus चे रुग्ण सापडत आहेत आणि आता भारतातही हा आजार पसरण्याचा धोका असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : सध्या भारतात कोरोनाव्हायरस (Coronavirus) कहर माजवतो आहे, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशात आता आणखी एका चीनी व्हायरसचं संकट आहे. भारतात कॅट क्यु व्हायरस (Cat Que Virus) पसरण्याचा धोका आहे.  इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे आयसीएमआरने (ICMR) याबाबत सावध केलं आहे. आयसीएमआरच्या संशोधकांना CQV हा व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस डुक्कर आणि क्युलेक्स डासांमध्ये असतो. चीन आणि व्हिएतनामध्ये मोठ्या प्रमाणात या व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत. तर भारतातील दोन लोकांमध्ये या व्हायरसविरोधातील अँटिबॉडी सापडल्या आहे. त्यामुळे भारतातही हा आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. काही वर्षांपूर्वी आयसीएमआरने भारतीतल काही लोकांचे सीरम सॅम्पल घेतले होते. त्याची टेस्ट केली होती. त्यावेळी दोन जणांमुळे अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटिबॉडी सापडल्या आहेत. म्हणजेच या दोघांनाही कधीतरी सीक्यूव्हीची लागण झाली होती, असं स्पष्ट होतं. या दोन्ही व्यक्ती कर्नाटकातील आहेत. 2014 आणि 2017 साली दोघांचेही नमुने घेण्यात आले होते. आयसीएआरने याबाबत आयजेएमआर (IJMR) या जर्नलमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. हे वाचा - लवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला सध्या चीन आणि व्हिएतनामध्ये सीक्यूव्हीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. शिवाय भारतात आधीच या व्हायरसचे रुग्ण होते. त्यामुळे कोरोनाच्या संकटात हा व्हायरसही भारतात पसरेल, याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे आणि त्या दिशेनं आवश्यक ते प्रतिबंधात्कम उपाययोजनांच्या दिशेनं काम करावं, असा सल्ला देण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Virus

    पुढील बातम्या