मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अखेर भारतीयांनी कोरोनाविरोधातील उपचार शोधलाच! क्लिनिकल ट्रायललादेखील मंजुरी

अखेर भारतीयांनी कोरोनाविरोधातील उपचार शोधलाच! क्लिनिकल ट्रायललादेखील मंजुरी

यामुळे कोरोनाव्हायरसवर (coronavirus) उपचार होतीलच शिवाय बचावही करता येईल असा विश्वास ICMR ने व्यक्त केला आहे.

यामुळे कोरोनाव्हायरसवर (coronavirus) उपचार होतीलच शिवाय बचावही करता येईल असा विश्वास ICMR ने व्यक्त केला आहे.

यामुळे कोरोनाव्हायरसवर (coronavirus) उपचार होतीलच शिवाय बचावही करता येईल असा विश्वास ICMR ने व्यक्त केला आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) विविध औषधांनी उपचार केले जात आहे. लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. प्लाझ्मा थेरेपीचाही वापर करण्यात आला, मात्र प्लाझ्मा थेरेपी फारशी प्रभावी नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  (ICMR) स्पष्ट केलं आहे. मात्र आता भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधातील प्रभावी असा उपचार शोधूनच काढला. या उपचाराच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी मिळाली आहे.

आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल (Biological E. Limited, Hyderabad) कंपनीने मिळून एक अँटिसेरा (Antisera) विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे.

अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. ज्यामध्ये एखाद्या विशेष आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं (antibody) प्रमाण अधिक असतं. कोणत्याही विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत.

हे वाचा - ऑक्टोबरमध्ये आली GOOD NEWS! 7 दिवसात पॉझिटिव्हिटी रेट घटला

याआधीदेखील रेबीज, हेपेटायटिस, वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया यासारख्या अनेक व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत, असं आयसीएमआरने सांगितलं. आता कोरोनाव्हासरवर उपचारासाठी घोड्यांना निष्क्रिय Sars-Cov-2 चं इंजेक्शन देऊन हे अँटिसेरा विकसित करण्यात आलं आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून हे अँटिसेरा विकसित केलं आहे. आम्ही घोड्याचं सेरा तयार केलं आहे. घोड्यांवर सेराचा अभ्यासही पूर्ण केला आहे.  आम्हाला आता याच्या क्लिनिक ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.

हे वाचा - मोदी सरकारनं आणलं AYUSH 64; कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आयुर्वेदिक औषध

कोरोनामुक्त रुग्णांच्या प्लाझ्माचा वापरही असाच केला जातो. मात्र या प्लाझ्मामधील अँटिबॉडीजची पातळी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते. ज्यामुळे त्याचा वापर करताना अडचणी येतात. हे अँटीसेरा कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोनापासूनही बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल, असा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus