Grand i10 पासून Creta पर्यंत, Hyundai च्या या गाड्यांवर 2 लाखांची सवलत

सणासुदीच्या दिवसांत यावर्षी गाडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Hyundai कंपनीने स्मार्ट डील्स ऑन व्हील्स (smart deals on wheels)ही योजना आणली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 09:15 PM IST

Grand i10 पासून Creta पर्यंत, Hyundai च्या या गाड्यांवर 2 लाखांची सवलत

मुंबई, 4 ऑक्टोबर : सणासुदीच्या दिवसांत यावर्षी गाडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Hyundai कंपनीने स्मार्ट डील्स ऑन व्हील्स (smart deals on wheels)ही योजना आणली आहे.

Grand i10, Elite i20, Santro, Creta या गाड्यांसोबतच Hyundai कंपनीच्या सगळ्या गाड्यांवर जोरदार सवलत देण्यात आली आहे.

Grand i10: या शानदार हॅचबॅक कारवर 95 हजार रुपयांची सूट मिळतेय. ही ऑफर Grand i10 च्या पेट्रोल, डिझेल आणि ऑटोमॅटिक कारवर आहे.

Elite i20 : प्रिमियम हॅचबॅक एलिट i20 च्या पेट्रोल, डिझेल आणि ऑटोमॅटिक मॉडेलवर 65 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.

Santro : सँट्रोचं पेट्रोव किंवा ऑटोमॅटिक मॉडेलवर 65 हजारांची सूट देण्यात आली आहे.

Loading...

(हेही वाचा : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर)

Grand i10 Nios/Venue: या गाड्यांना चांगली मागणी आहे. तरीही सणांचे दिवस असल्यामुळे कंपनी लवकरात लवकर या गाड्यांची डिलिव्हरी देतेय.

Xcent: या कारच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेलवर 95 हजार रुपयांची सूट आहे.

Verna: या लोकप्रिय गाडीवरही 60 हजारांची सवलत आहे.

Elantra/Tucson: या प्रिमियम सिदान आणि SUV गाड्यांवर 2 लाख रुपयांची भरभक्कम सूट आहे.

============================================================================================

VIDEO : बंडखोरांना जागा दाखवू, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: automoney
First Published: Oct 4, 2019 08:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...