मुंबई, 12 जानेवारी : सिंह (lion) म्हणजे जंगलाचा राजा (King of the Jungle) . पण जेव्हा रानटी कुत्रे (Wild Dogs) किंवा तरस (Hyena) असे छोटे प्राणी कळपानं त्याच्यासमोर येतात तेव्हा ते त्याला भारी पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होतो आहे. ज्यामध्ये तरसांच्या कळपानं सिंहाला घेरलं (Hyena Vs Lion Fight) आहे, ते त्याच्यावर हल्लाही करत आहेत पण त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दोस्ताची एंट्री होते.
बीबीसीनं आपल्या यूट्युब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर केला होता. तसा हा व्हिडीओ जुना आहे. म्हणजे दोन वर्षांपूर्वीचा आहे. मात्र लोकांना आता खूप आवडतो आहे.
व्हिडीओत पाहू शकता. एक सिंह छोटी नदी पार करतो आणि तरसांच्या कळपात अडकतो. सिंहाला घाबरण्याऐवजी तरस त्याला घेरतात, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला आपला शिकार बनवण्याचा विचार करतात.
या सिंहाचं नाव रेड आहे. तो तरसांना पळवण्याचा खूप प्रयत्न करतो पण तरस त्याच्यावर वारंवार हल्ला करतात. त्यांच्यासमोर सिंहाचंही काहीच चालत नाही. तो तरसांवर हल्ला करण्याऐवजी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आता सिंहाचं काही खरं नाही. असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटेल. पण पिक्चर अभी बाकी है दोस्त. इथं एक ट्विस्ट येतो. रेडला वाचवण्यासाठी त्याचा मित्र तातू येतो. दुसऱ्या सिंहाला आपल्या जवळ येताना पाहताच तरस तिथून पळून जातात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप आवडतो आहे. आयुष्यात एक तरी मित्र असा जरूर असावा अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना असतात. हे यातून स्पष्ट होतं.