Home /News /lifestyle /

Hydrogen Sulphide ने बरे होणार HIV रुग्ण; भारतीय शास्त्रज्ञांना सापडला नवा प्रभावी उपचार

Hydrogen Sulphide ने बरे होणार HIV रुग्ण; भारतीय शास्त्रज्ञांना सापडला नवा प्रभावी उपचार

फोटो सौजन्य - Reuters

फोटो सौजन्य - Reuters

हायड्रोजन सल्फाइड वायूच्या (Hydrogen Sulphide) मदतीने HIV रुग्णांवर उपचार केल्यास विषाणूची वाढ होण्यापासून थांबवता येईल असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

बंगळुरू, 08 डिसेंबर : जगभरात असे काही दुर्मिळ, दुर्धर आजार आहेत, ज्यातून कायमस्वरुपी बरं करणारं औषध आजही सापडलेले नाही. काही आजारांची तीव्रता रोखणारी औषधं शोधून काढण्यात संशोधकांना यश आलं आहे, पण आजार पूर्णतः बरी करणारी औषधे किंवा उपचार पद्धती अद्याप मिळालेली नाही. अशा काही आजारांपैकी एक म्हणजे एचआयव्ही (HIV). गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्हीच्या विषाणूमुळे होणाऱ्या एडसच्या (AIDS)आजाराने आपल्या देशात हातपाय पसरले आहेत. हा आजार पूर्ण बरा करणारे उपचार अद्यापही सापडलेले नाहीत. मात्र आता या आजारावर अधिक अत्यंत प्रभावी अशी एक उपचार पद्धती शोधून काढण्यात यश आल्याचा दावा बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (IISC Bengaluru) संशोधकांनी केला आहे. हायड्रोजन सल्फाइड वायूच्या (Hydrogen Sulphide) मदतीने एचआयव्ही रुग्णांवर उपचार केल्यास एचआयव्हीच्या विषाणूची वाढ होण्यापासून थांबवता येईल असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. इलाइफ जर्नलमध्ये (Elife Journal) हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. देशातील प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील (आयआयएससी) मायक्रोबायोलॉजी आणि सेल बायोलॉजी विभागातील संशोधक तसेच बंगलोर मेडिकल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधक या अभ्यासात सहभागी होते. संशोधकांनी एचआयव्ही रुग्णांवर हायड्रोजन सल्फाइडच्या मदतीने प्रभावी उपचार करण्याचे एक तंत्रज्ञान विकसित केले असून, हायड्रोजन सल्फाइड थेट एचआयव्हीच्या विषाणूवर हल्ला करेल, ज्यामुळे विषाणू वाढू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हायड्रोजन सल्फाइडच्या माध्यमातून एचआयव्हीविरूद्ध प्रभावी भूमिका बजावणारी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) विकसित करता येईल आणि त्यामुळे हा आजार बरा करण्यासाठी मोठी मदत मिळेल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. हे वाचा - एक गोळी खाऊन मिळणार व्यायामाइतकेच फायदे; शास्त्रज्ञांनी शोधला अनोखा मार्ग टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, सध्या एचआयव्ही विषाणूवरील (HIVvirus) उपचारासाठी वापरण्यात येणारी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) यामुळे होणारा आजार पूर्णपणे बरा करत नाही. या उपचार पद्धतीत हा विषाणू फक्त दडपून टाकला जातो. त्यामुळे हा विषाणू रुग्णाच्या शरीरात कुठेतरी लपून राहतो. काही रुग्णांमध्ये तर सध्याची अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) पूर्णपणे अपयशी ठरते.तसंच या थेरपीची आणखी एक समस्या अशी आहे की कधीकधी यामुळे शरीरात विषारी रसायने तयार होऊ लागतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव (Oxidative Stress) वाढू लागतो आणि पेशींच्या आतील माइटोकॉन्ड्रियादेखील काम करणे थांबवतात. माइटोकॉन्ड्रिया (Mytocondria) हे पेशींचे पॉवरहाऊस (Power house) असतात, कारण यामध्ये ऊर्जा निर्माण होते. त्यांनी काम करणे बंद केल्यानं त्यामुळे पेशींवर सूज येऊ लागते आणि शरीरातील अनेक अवयवांचे कार्य बिघडते. मात्र ही एआरटी बंद करणेदेखील शक्य नसते कारण हे उपचार केले नाहीत तर हा विषाणू शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचू शकतो आणि शरीराला नुकसान पोहोचवू शकतो. हे वाचा - Omicron कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा आहे वेगळा, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष याबाबत अधिक माहिती देतान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक अमित सिंग म्हणाले की, सध्याच्या एआरटीची ही कमतरता लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी एचआयव्ही-संक्रमित पेशींवर हायड्रोजन सल्फाइडचा प्रभाव तपासण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मायटोकॉन्ड्रियाचे बिघडलेले कार्य मोजण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. यात असे आढळून आले की एन-एसिटिलसिस्टीन (N-acetylcysteine) नावाचा एक रासायनिक घटक एचआयव्हीच्या लपलेल्या विषाणूंना निष्क्रिय करण्यास सक्षम आहे. यामुळे या विषाणूची पुनरुत्पादन करण्याची क्षमता संपुष्टात येते. जर्मनीतील या विषयावरच्या अभ्यासातही, हायड्रोजन सल्फाइडमुळे एन-एसिटिलसिस्टीन एचआयव्ही पेशी अंशतः निष्क्रिय करते असा निष्कर्ष समोर आला आहे. यामुळे भारतीय संशोधकांच्या संशोधनाला पुष्टी मिळाली असून, आता एचआयव्ही विषाणूमुळे होणारा आजार पूर्णतः बरा होण्याची शक्यता दिसू लागली आहे. ही अत्यंत मोलाची बाब आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Serious diseases, Virus

पुढील बातम्या