हैदराबाद, 05 नोव्हेंबर : रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा... वाहनांच्या या गर्दीत एक Ambulance... ज्यामध्ये एक जीव तडफडत होता... वाट मोकळी करण्यासाठी रुग्णवाहिकेचा सायरन जोरजोरात वाजत होता... मात्र अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग काही मोकळा होत नव्हता. ड्युटीवर तैनात वाहतूक पोलिसानं हे पाहिलं आणि तडफडणारा जीव वाचवण्यासाठी हा पोलीस (Traffic Police) स्वत:च धावत सुटला.
रुग्णवाहिका मागे आणि वाहतूक पोलीस पुढे असं दृश्यं दिसलं ते हैदराबादच्या रस्त्यावर. जिथं ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकली आणि त्या रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्यासाठी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल या ट्रॅफिकमधून धावला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या पोलिसाचं नाव बाबजी असल्याचं सांगितलं जातं आहे.
HTP officer Babji of Abids Traffic PS clearing the way for ambulance..Well done..HTP in the service of citizens..👍👍@HYDTP pic.twitter.com/vFynLl7VVK
अबिड्सहून ही रुग्णवाहिका कोटीला जात होती. त्यावेळी तिथं वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल बाबजी ड्युटीवर होते. त्यांनी पाहिलं ही ट्रॅफिकमधून या रुग्णवाहिकेला काही वाट मिळत नाही आहे. रुग्णवाहिका धीम्या गतीनं चालते आहे. त्यांनी पाहिलं रुग्णवाहिकेत एक जीव जीवनमरणाशी झुंज देत होता. त्याच क्षणी त्यांनी आपली जागा सोडली आणि ते रस्त्यावरून धावत सुटले. बाबजी तब्बल 2 किमीपर्यंत धावत गेले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुमार यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यांनी बाबजी यांचं कौतुुक केलं आहे. "हैदराबाद वाहतूक पोलीस बाबजी रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करताना दिसत आहेत. खूप छान. हैदराबाद वाहतूक पोलीस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे"
आपकी मदद के लिए #Khaakhi मीलों दौड़ जाएगी, पर कभी थमेगी नहीं.
आयपीएस दीपांशू काबरा यांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले, "हैदराबाद पोलीस रुग्णवाहिकेच्या मदतीसाठी काही अंतर धावला. तो रुग्ण आता बरा असावा, अशी आशा आहे. पोलिसाचं समर्पण आणि सेवेसाठी सॅल्युट"