खूशखबर! आणखी एक मेड इन इंडिया कोरोना लस; क्लिनिकल ट्रायलसाठी मिळाला ग्रीन सिग्नल

खूशखबर! आणखी एक मेड इन इंडिया कोरोना लस; क्लिनिकल ट्रायलसाठी मिळाला ग्रीन सिग्नल

भारताच्या तिसऱ्या कोरोना लशीला (corona vaccine) ह्युमन ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : कोवॅक्सिन (covaxin) आणि ZyCoV-D पाठोपाठ आता  भारताची आणखी एक कोरोना लस (corona vaccine) तयार झाली आहे. या लशीच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी मिळाली आहे. हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड (Biological E Ltd) कंपनीने तयार केलेली ही कोरोना लस. या लशीच्या ह्युमन ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारताची ही तिसरी कोरोना लस आहे.

हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या कोरोना लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच हे ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

सध्या भारतात तीन कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. यामध्ये भारतातल्या भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन, झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीची ZyCoV-D आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका-सीरम इन्स्टिट्युटची Covishield लशीचा समावेश आहे. शिवाय रशियाच्या  Sputnik V लशीचंही ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

भारतात राबवला जाणार कोव्हिड 19 लशीकरण कार्यक्रम

पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लस उपलब्ध होण्याची आशा आहे. प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी  मोदी सरकारने देशव्यापी कोव्हिड 19 लशीकरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

हे वाचा - कोरोना लस मोफत! BJP चा चुनावी जुमला, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संतापल्या

देशभरातील कोरोना लशीचा पुरवठा केंद्र सरकारच्या हाती असेल. यासाठी विशेष लशीकरण कार्यक्रम राबवला जाईल, त्याअंतर्गत प्राधान्यक्रम ठरवून मोफत लस दिली जाईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार अशा 30 कोटी लोकांना मोफत लस देणार आहे. या लोकांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्यांचे चार गट करण्यात आले आहेत आणि या लोकांनाच कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.

हे वाचा - लशीकरणाचा मार्ग खडतर ! कोरोना लस लोकांपर्यंत पोहोचवण्यात 'हे' अडथळे येणार

30 कोटी लोकांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. सर्वात आधी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सेस आणि आशा वर्कर्स यांना लस दिली जाईल. अशा एक कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महापालिका कर्मचारी, पोलीस अशा 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वयापेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 26 कोटी सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल. तर एक कोटी लोक असे असतील ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे, मात्र त्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि देखभालीची गरज आहे.

Published by: Priya Lad
First published: October 27, 2020, 11:00 PM IST

ताज्या बातम्या