Home /News /lifestyle /

पुरुषांची सिगारेट ओढण्याची सवय महिलांच्या जीवावर; नव्या आकडेवारीवरून भयावह चित्र समोर

पुरुषांची सिगारेट ओढण्याची सवय महिलांच्या जीवावर; नव्या आकडेवारीवरून भयावह चित्र समोर

सिगरेटच्या धुरामुळं घरातील व्यक्ती, पत्नी आणि कुटुंबावरही परिणाम होतो. GSVM हॉस्पिटल, कानपूरच्या चेस्ट डिपार्टमेंटच्या एका नवीन अभ्यासात, महिला मोठ्या प्रमाणात COPD आजारानं ग्रस्त असल्याची खात्री झाली आहे, तेही त्यांनी कधीच सिगरेट ओढलेली नसताना.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : पुरुषांमध्ये सिगरेटची (Cigarette) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. यातून होणाऱ्या आजारांची माहिती असतानाही लोक स्वत:ला सुधारण्याच्या मन:स्थितीत आजिबात नाहीत. बहुतेक पुरुष आणि काही टक्के स्त्रिया आपल्या जीवाची पर्वा न करता सिगरेट ओढत (smoking) राहतात. सिगरेट ओढणं सोडून देऊन ते या संकटातून स्वतःला वाचवू शकतात. पण ते असं करत नाहीत. आपल्या मागे असलेल्या कुटुंबाचं काय होणार, याचा विचारही ते करत नाहीत. हे लोक त्यांची तब्येत बिघडवत आहेत; मग बाकी कोणाला काय फरक पडतो? त्यांचा पैसा, त्यांचं आयुष्य, ते त्यांना हवं ते करू शकतात, अशी त्यांची विचारसरणी आहे. पण नुकताच समोर आलेला एक आकडा असा विचार करणाऱ्यांनाही हादरवून सोडणारा आहे. यामध्ये सिगरेट ओढणाऱ्या पुरुषांच्या पत्नींनाही त्यामुळं होणाऱ्या आजारांबाबतची माहिती समोर आली आहे. (The wives of men who smoke cigarettes are also getting diseases caused by it) म्हणजेच, सिगारेटच्या धुरामुळं घरातील व्यक्ती, पत्नी आणि कुटुंबावरही परिणाम होतो. GSVM हॉस्पिटल, कानपूरच्या चेस्ट डिपार्टमेंटच्या एका नवीन अभ्यासात, महिला मोठ्या प्रमाणात COPD आजारानं ग्रस्त असल्याची खात्री झाली आहे, तेही त्यांनी कधीच सिगारेट ओढलेली नसताना. हे वाचा - रात्री पायाच्या तळव्यांना मालिश करण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील आपल्याला काही झालं तर काय होईल याचा विचार न करता सिगरेट च्या दुष्टचक्रात अडकलेलं कुटुंब धुम्रपान न करता महिला फुफ्फुसाच्या आजारांच्या बळी ठरत आहेत. कानपूरमध्ये झालेल्या एका संशोधनात असं आढळून आलंय की, फुफ्फुसाच्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजने ग्रस्त असलेल्या बहुतांश महिला अशा आहेत, ज्यांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही. परंतु, त्यांच्या पतींना सिगारेट ओढण्याची खूप सवय आहे. याचा फटका आता त्यांच्या पत्नींना सहन करावा लागत आहे. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या चेस्ट डिपार्टमेंटच्या टीमनं सीओपीडी आजारानं ग्रस्त सुमारे 170 लोकांवर संशोधन केलं तेव्हा असं आढळून आलं की, या आजारानं ग्रासलेले सुमारे 26 टक्के लोक असे आहेत की, ज्यांनी कधीच एकदाही सिगरेट ओढलेली नाही. तर, 55 टक्के लोक होते ज्यांचे पती, वडील किंवा इतर सदस्य त्यांच्या घरात सिगारेट ओढतात. हे वाचा - तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर दरवर्षी 70 टक्के लोकांच्या मृत्यूचं कारण आहे सिगरेट नवीन अहवालात असं समोर आलंय की, सिगरेट मुळं होणाऱ्या हानीचे बळी केवळ सिगरेट ओढणारेच नाहीत तर, जे सिगरेटला कधी हातही लावलेला नाही तेही आहेत. (फुफ्फुसाचा आजार ज्यांनी कधी धूम्रपान केलं नाही त्यांनाही होत आहे). त्याचं कारण म्हणजे हवेत पसरणारा आणि प्रत्येकाच्या श्वासात मिसळणारा धूर त्यांना रोगग्रस्त किंवा आजारी बनवत आहे. दरवर्षी सुमारे 70 टक्के लोक सिगारेटच्या विषबाधेनं मरत आहेत. तर, 80 टक्के लोकांचा मृत्यू तंबाखूमुळं होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Smoking

    पुढील बातम्या