Home /News /lifestyle /

ऐकावं ते नवल! 'या' गावात प्रेग्नंट होताच बायको स्वतःच लावून देते आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न; खास आहे कारण...

ऐकावं ते नवल! 'या' गावात प्रेग्नंट होताच बायको स्वतःच लावून देते आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न; खास आहे कारण...

बायको प्रेग्नंट होताच नवरा दुसरं लग्न करतो. तरी ना बायको त्याला काही म्हणत ना समाज.

    अजमेर, 18 जून :  भारतात घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं कायद्याने गुन्हा आहे. पहिली पत्नी असताना पतीला दुसरं लग्न करण्याची हिंदू धर्मात परवानगी नाही. शिवाय कोणतीच महिला आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला मान्यता देणार नाही. असं असताना भारतात असं एक गाव आहे, जिथं खुद्द बायकोच हसत हसत आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देते, तेसुद्धा ती प्रेग्नंट झाल्यावर. आपण प्रेग्नंट होताच बायको आपल्या दुसऱ्या नवऱ्याचं लग्न लावून देते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, यावर विश्वास बसणार नाही पण असं करण्यामागे एक खास कारण आहे (Husband Remarry After Wife Is Pregnant). पहिली पत्नी प्रेग्नंट असताना नवऱ्याने दुसरं लग्न करण्याची ही अजब प्रथा आहे ती राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील देरासर गावातील. कित्येक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. बायको प्रेग्नंट असताना नवरा दुसरं लग्न करतो आणि त्याची बायको, समाज कुणीच त्याला काही बोलत नाही. याचं कारण आहे ते म्हणजे पाणी. पाण्यासाठी गरोदर महिला आपल्या नवऱ्याचं हसत हसत, आनंदात दुसऱ्या महिलेसोबत लग्न लावून देतात. हे वाचा - स्वतःच्या GF चा हात पकडणंही तरुणाला पडलं महागात; 8 वर्षांनंतरही मुंबईतील कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा आता हे कारण वाचूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. फक्त पाण्यासाठी आपल्या पोटात बाळ असताना कोणतीही महिला आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न का बरं लावून देत असेल, असा प्रश्न तुम्हााल पडेल. या गावात पाण्याचा तुटवडा आहे. महिला कित्येक मैल पायपीट करून पाणी आणतात. इथं पुरुष घरातील काम करत नाहीत आणि जेव्हा महिला प्रेग्नंट होतात तेव्हा त्यांना पाणी भरणं शक्य होत नाही. त्यामुळे नवरा दुसरं लग्न करून दुसरी बायको आणतो. जेणेकरून पहिली पत्नी प्रेग्नंट असताना दुसरी पत्नी पाणी भरेल आणि घरात पाण्याचा तुटवडा नसेल. प्रेग्नंट बायको घरी आराम करते आणि दुसरी बायको पाणी भरायला जाते. पाण्यामुळे या लग्नाबाबत पहिल्या पत्नीला काहीच हरकत नसते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Culture and tradition, Lifestyle, Pregnancy, Rajasthan, Relationship, Wife and husband

    पुढील बातम्या