मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मराठी-हिंदीवरून नवरा-बायकोत तूतू-मैमै; प्रेमविवाहानंतर 15 दिवसांतच गाठलं पोलीस ठाणे

मराठी-हिंदीवरून नवरा-बायकोत तूतू-मैमै; प्रेमविवाहानंतर 15 दिवसांतच गाठलं पोलीस ठाणे

राजकारणात भाषेवरून वाद रंगल्याचं तर आपण अनेकदा पाहिलं आहे, संसारातही आता भाषेच्या वादाची ठिणगी पडली आहे.

राजकारणात भाषेवरून वाद रंगल्याचं तर आपण अनेकदा पाहिलं आहे, संसारातही आता भाषेच्या वादाची ठिणगी पडली आहे.

राजकारणात भाषेवरून वाद रंगल्याचं तर आपण अनेकदा पाहिलं आहे, संसारातही आता भाषेच्या वादाची ठिणगी पडली आहे.

  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 09 डिसेंबर : सध्या अनेकजण प्रेमविवाह (love marriage)करतात. काही जोडीदारांच्या भाषा (language) वेगवेगळ्या असतात. अनेकदा आपला जोडीदार काय म्हणतो आहे, तेच समजत नाही आणि हीच भाषा आता एका दाम्पत्यामधील वादाचं कारण ठरली आहे.  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनमधून एक प्रकरण समोर आलं असून इथं भाषेमुळे नवरा बायकोमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. नागपूरमधील महिला आणि उज्जैनमधील युवकाचं प्रेम जमलं. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये भाषेचा अडसर येऊ लागल्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण गेलं. सध्या या प्रकरणाची उज्जैनमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार नागपूरमधील विधवा (Nagpur Widow) महिलेचं लॉकडाऊन काळात मोबाईलच्या राँग नंबरमुळे उज्जैनमधील एका युवकाशी प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी लग्न केलं. उज्जैनला आल्यानंतर दोघांमध्ये भाषेवरून (dispute over marathi) वाद होऊ लागला.

हे वाचा - बायकोशी भांडून घराबाहेर चालत राहिला नवरा; राग शांत झाल्यावर लक्षात आलं....

महिला महाराष्ट्रातील असल्याने तिला मराठी येत होतं. मात्र तिच्या पतीला मराठी येत नसल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले. काही दिवसांपूर्वी ते उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी देखील त्यांचा मोठा वाद झाला. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तो पुरुष बाईची छेड काढतो असं समजून पोलिसांकडे या घटनेची तक्रार केली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये दोघांनाही नेण्यात आलं.

त्यानंतर या दोघांनी आपली कहाणी पोलिसांना सांगितली. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार 31 वर्षीय ही महिला नागपूरची रहिवासी असून 15 दिवसांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. मात्र तिला हिंदी येत नसल्यानं दोघांना संभाषणात अडचण येत होती. यामुळे तिच्या पतीबरोबर तिचे नेहमी वाद होत असतं.

हे वाचा - लॉकडाऊनचा असाही एक फायदा; पती-पत्नींमधील दुरावा संपला

लग्नाचे संबंध समजूतदारपणावर अवलंबून असतात. त्यामुळे दोघांनीही सांभाळून घ्यायचं असतं. पोलीसही अशा प्रकरणांमध्ये काउन्सलरकडे पाठवतात. त्यातून अनेक घटस्फोट रोखले जातात. या प्रकरणात पोलिसांनी दोघांचाही जबाब नोंदवला. नातेवाईकांना याची माहिती देऊन वन स्टेप सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर या महिलेची आई आणि भाऊ तिला नेण्यासाठी उज्जैनला येत आहेत असं पोलिसांनी सांगितलं.

First published:

Tags: Relationship, Wife and husband