Home /News /lifestyle /

'त्याची ती मागणी पूर्ण करता करता माझा जीव जाईल', नवऱ्याच्या विचित्र सवयीला वैतागलेल्या बायकोला हवाय घटस्फोट

'त्याची ती मागणी पूर्ण करता करता माझा जीव जाईल', नवऱ्याच्या विचित्र सवयीला वैतागलेल्या बायकोला हवाय घटस्फोट

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सतत नवऱ्याच्या त्या मागणीला वैतागलेल्या बायकोने घटस्फोटासाठी कोर्टात घेतली धाव.

    अबुजा, 12 जानेवारी : नवरा-बायकोची (Husband wife) भांडणं काही वेळा इतकी विकोपाला जातात की ती घटस्फोटापर्यंत (Divorce case) पोहोचतात. सध्या असंच एक घटस्फोटाचं प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात नवऱ्याच्या विचित्र सवयीला वैतागलेल्या बायकोने घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. तिचा नवरा तिच्याकडे सतत अशी मागणी करतो, ज्यामुळे ती मागणी पूर्ण करता करता आपला जीव जाईल असं या महिलेचं म्हणणं आहे (Husband demand sex Wife want divorce ). नायजेरियात राहणाऱ्या ओलमिड लवालला  (Olamide Lawal) तिचा नवरा सहीद लवाल (Saheed Lawal). यांच्या लग्ना 14 वर्षे झाली. त्यांना तीन मुलंही आहेत. इतक्या वर्षांच्या संसारानंतर ओलमिडला सहीदकडून  घटस्फोट हवा आहे. 7 जानेवारीला तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ओलमिड मागितलेल्या घटस्फोटाचं मुख्य कारण म्हणजे तिच्या नवऱ्याला असलेली एक विचित्र सवय. ज्यासाठी तो तिच्यावर बळजबरी करतो. त्याची मागणी पूर्ण करताना तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हे वाचा - VIDEO - पाठवणीवेळी नवरीने पसरलं भोकाड; गाडीत नवरदेवाने असं काही केलं की आवाज बंद ओलमिडने सांगितलं, लग्नाला 14 वर्षे झाली पण नवऱ्यात माणुसकी बिलकुल नाही. घरखर्चाला पैसे देत नाही. नेहमी दारू पितो. दारू पिऊन तो मारहाणही करतो आणि नशेत जबरदस्तीही करतो. खूप सेक्स करतो. त्याची ही सवय माझा जीव घेईल. आता या सर्वाला मी वैतागली आहे आणि त्याच्यापासून मला विभक्त व्हायचं आहे. नवऱ्याला आपल्या घरी येण्यापासून रोखावं अशी मागणीही तिने कोर्टाकडे केली आहे. तर तिचा नवरा सहीदने आपली बाजू मांडताना आपण दारू सोडल्याचं सांगितलं. तसंच आपल्या मुलांची देखभाल करण्याची तयारीही दर्शवली. हे वाचा - 'PubG ने बना दी जोडी'! गेममुळे जुळलं सूत; प्रेमासाठी तरुणीचं थक्क करणारं काम आता 1 मार्चपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तोपर्यंत दाम्पत्याला शांततेत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं वृत्त प्रीमिअम टाइम्स नायजेरियाने दिल्याचं झी न्यूज हिंदीने म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Divorce, Relationship, Wife and husband, World news

    पुढील बातम्या