मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बर्थ डे विसरला म्हणून बायकोने दिली अशी शिक्षा; पुरता हडबडला नवरा

बर्थ डे विसरला म्हणून बायकोने दिली अशी शिक्षा; पुरता हडबडला नवरा

उच्चशिक्षित दाम्पत्यामध्ये वाढदिवसावरून वाद झाला आणि...

उच्चशिक्षित दाम्पत्यामध्ये वाढदिवसावरून वाद झाला आणि...

उच्चशिक्षित दाम्पत्यामध्ये वाढदिवसावरून वाद झाला आणि...

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : बायकोचा बर्थ डे विसरणं (Husband forget wife birthday) म्हणजे नवऱ्यांसाठी कोणत्या संकटापेक्षा कमी नसतं. त्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात हे त्यांनाच माहिती. बायको रागावते, चिडते, भांडणं होतात, काही दिवस ती अबोला धरते किंवा फार फार तर जेवण देत नाही. पण एका बायकोने तर हद्दच केली. तिने यापुढेही जाऊन थेट नवऱ्यासोबत नातं तोडण्याचाच निर्णय घेतला (Wife refused to live with husband forget her birthday).

आग्र्यात (Agra) राहणारं हे दाम्पत्य (Agra couple disputes) उच्चशिक्षित आहे. महिला पीएचडी करते आहे. तर तिचा नवरा कॉलेजमध्ये अकाऊंटट आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या छोटेमोठे वाद होतंच होते. पण बायकोच्या वाढदिवशी वाद विकोपालाच गेला.

हे वाचा - पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

नवऱ्याने आपल्याला बर्थ डे विश केलं नाही म्हणून बायको नाराज झाली. यानंतर तिने त्याच्यासोबत राहण्यासच नकार दिला. नवऱ्याने हात जोडून माफी मागितली. नातं तोडू नको म्हणून  विनवणी केली. तिला मनवण्याचा प्रयत्न केला. पण बायकोने त्याचं काहीच ऐकलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

मीडिया रिपोर्टनुसार अखेर कौटुंबिक सल्ला केंद्रापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. तिथं नवऱ्याविरोधात तिने तक्रार केली. महिलेने तीन वर्षांतील सर्व तक्रारींचा पाढाच वाचला. नवरा कोणतंही काम आईवडिलांना विचारल्याशिवाय करत नाही. यावरून त्यांच्यात वाद होत होतेच. याच भांडणाला वैतागलेला नवरा बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला आणि त्याची इतकी मोठी शिक्षा त्याला मिळाली.

हे वाचा - VIDEO - जीवासह लाजही वाचवली! जवानाने आपल्या वर्दीने झाकलं तरुणीचं विवस्त्र शरीर

या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं. अद्यापही या दाम्पत्याली वाद मिटलेला नाही. त्यांना आता समुपदेशनासाठी दुसरी तारीख देण्यात आली आहे.

First published:

Tags: Agra, Couple, Relationship, Wife and husband