बायकोशी भांडून घराबाहेर चालत राहिला नवरा; राग शांत झाल्यावर लक्षात आलं....

बायकोशी भांडून घराबाहेर चालत राहिला नवरा; राग शांत झाल्यावर लक्षात आलं....

बायकोशी भांडण करून घराबाहेर पडलेला नवरा, डोकं शांत होईपर्यंत चालत राहिला. राग थंड झाल्यावर त्याच्या लक्षात आलं घरापासून तो 420 किलोमीटर लांब पोहोचला होता.

  • Share this:

रोम, 8 डिसेंबर : आपला राग शांत करण्यासाठी प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. त्यावेळी काही लोक आपला राग व्यक्त करून शांत करतात. तर काही लोक काही न बोलता शांत राहतात. तर काही लोक झोपून राग शांत करतात. इटलीच्या एका व्यक्तीने आपला राग शांत करण्यासाठी एक सोपा मार्ग निवडला. परंतु रागाला शांत करण्याचा या मार्गाचा परिणाम तुम्हाला कळल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

एका इटालियन (Italian) माणसाचं आपल्या बायकोशी भांडण झाल्यानंतर राग शांत करण्यासाठी तो घरातून बाहेर पडला आणि त्या रागात भरात चालत राहिला. तो घरापासून किती दूर आलाय याची त्याला जाणीवच नव्हती एवढा राग डोक्यात भरला होता. राग शांत झाल्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा समजलं की तो घरापासून 420 किलोमीटर दूर आला आहे... चालत चालत! अखंड आठवडाभर तो चालत राहिला होता.

गेल्या महिन्यात इटलीतील (Italy) कोमो (Como) येथे राहणाऱ्या एका जोडप्यामध्ये भयंकर भांडण सुरू झाले. हे भांडण टोकाला गेलं आणि चिडलेल्या नवऱ्याने डोकं शांत होण्यासाठी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यात वेगळं असं काहीच नाही. बरेच लोक भांडणानंतर आपला राग शांत करण्यासाठी कुठल्यातरी शांत ठिकाणी निघून जातात. शतपावली करतात. परंतु या बातमीत एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती इतकी रागावली होती आणि त्या रागाच्या भरात आपण किती वेळ चालतोय आणि किती चालतोय हेही त्याच्या लक्षात आलं नाही. किती वेळ नव्हे, किती दिवस चालतोय याचंही त्याला भान राहिलं नाही.

रागाच्या भरात ती व्यक्ती घराबाहेर पडली आणि एक आठवडा चालतच राहिली व त्यानंतर जिथे त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यांना कळले की तो  घरापासून 420 किलोमीटर दूर आला आहे. रागात असल्यामुळे ते इतके दूर कसे आले हे त्यांना जाणवलेच नाही. गिमारा शहरातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोलिसांच्या गाडीने पॅट्रोलिंग करताना त्याला पाहिलं आणि चौकशी केली. मग त्यांना कळलं की एक रागावलेला नवरा आहे आणि कोमा शहरातून सुमारे 420 किलोमीटर अंतरावर गिमारा शहरात चालत आलेला आहे.

इटलीमध्ये Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा कर्फ्यू लागू केला आहे. लोक Curfew चं पालन करीत आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करत होते. त्यानंतर त्यांना रात्री अडीच वाजता एक व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसली तर व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. तिथे त्यांना अशी माहिती मिळाली की या व्यक्तीचा पत्नीने तिचा पती बेपत्ता असलेल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती.

यावर तो नवरा म्हणाला की,"माझं माझ्या पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर राग शांत करण्यासाठी मी घराबाहेर पडलो आणि चालतच राहिलो मी कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा वापर केला नाही. रस्त्यात चालत असताना लोकांनी मला जे काही दिले तेच मी खाल्ले."

त्या व्यक्तीचे सर्व काही बोलणे ऐकून पोलिसांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्याला नंतर घरी सोडले. परंतु कर्फ्यूचं पालन न केल्यामुळे त्या व्यक्तीला 400 युरो (Euro) म्हणजे 35 हजार रुपये दंड भरावा लागला. पोलिसांनी त्या व्यक्तीला हॉटेलमध्ये थांबवलं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी तिथे पोचली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन गेली.

First published: December 8, 2020, 7:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading