Home /News /lifestyle /

लॉकडाऊनमध्ये खासदाराची SEX PARTY; पोलिसांनी धाड टाकताच धूम ठोकण्याचा प्रयत्न

लॉकडाऊनमध्ये खासदाराची SEX PARTY; पोलिसांनी धाड टाकताच धूम ठोकण्याचा प्रयत्न

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत SEX PARTY करणाऱ्या खासदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

    बुडापेस्ट, 02 डिसेंबर : सर्वसामान्य लोक कोरोना लॉकडाऊनच्या कठोर नियमांचं पालन करत आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी नियम धाब्यावर बसवत आहेत. अशाच एका हंगेरीतील खासदारानं लॉकडाऊनमध्ये सेक्स पार्टी केली. पोलिसांनी धाड टाकताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. हंगेरीतील खासदार (hungarian parliamentarian) जोसेफ जाजेर (Jozsef Szajer) बेल्जिअमची राजधानी ब्रुसेल्समध्ये सेक्स पार्टी करत होते. द टाइम्स यूकेच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 59 वर्षाचे जोसेफ  Fidesz पार्टीचे फाऊंडिंग मेंबर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिटी सेंटरमध्ये ही पार्टी सुरू होती. त्यामध्ये 20 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये काही युरोपियन डिप्लोमेट्सदेखील होते. जोसेफ जाजेरही या पार्टीत होते. रिपोर्टनुसार पोलिसांनी जेव्हा या पार्टीवर छापा टाकला तेव्हा पहिल्या मजल्यावरून खिडकीतून त्यांनी उडी मारली आणि ते जखमी झाले. हे वाचा - Instagram वर फोटो शेअर करणं मॉडेलला पडलं महाग; दरोडेखोरांनी केली भयंकर अवस्था जाजेर यांनी या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेतल्याचा आरोप फेटाळला आहे. शिवाय ते कोणत्याही सेक्शुअल अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी नव्हतो. असा दावा त्यांनी केला आहे. कोरोना गाइडलाइन्सच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मात्र त्यांनी माफी मागितली आहे. जाजेर म्हणाले, "पोलिसांनी माझ्याकडे आयडी मागितला मात्र माझ्याकडे तेव्हा कोणताही आयडी नव्हता. मी त्यांना मेंबर ऑफ पार्लिमेंट असल्याचं सांगितलं. पोलिसांनी मला समज देऊन घरी पाठवलं.  कोरोना गाइडलाईन्सच्या नियमांचं उल्लंघ केल्याप्रकरणी मी माफी मागतो. हा माझा बेजबाबदारपणा आहे आणि याची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे" हे वाचा - दावा-'जिन्ना' यांच्या नावावरून दारूचा ब्रँड,व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ जोसेफ यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर वैयक्तिक कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या