मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /#HumanStory: एका गावाची ‘खरी’ गोष्ट! इथं फक्त ‘पाण्यासाठी’ होतात लग्न

#HumanStory: एका गावाची ‘खरी’ गोष्ट! इथं फक्त ‘पाण्यासाठी’ होतात लग्न

आता, प्रत्येक सीझनमध्ये दिवसाचे 10 ते 12 तास पाणी आणल्यामुळे आता रमाचे केस गळू लागले आहेत. मान आणि कंबर सतत दुखत असते. तिला मुलं जन्माला घालण्याचीही परवानगी नाही.  का? कारण तिला मुलं झाली तर मग पाणी कोण भरणार?

आता, प्रत्येक सीझनमध्ये दिवसाचे 10 ते 12 तास पाणी आणल्यामुळे आता रमाचे केस गळू लागले आहेत. मान आणि कंबर सतत दुखत असते. तिला मुलं जन्माला घालण्याचीही परवानगी नाही. का? कारण तिला मुलं झाली तर मग पाणी कोण भरणार?

आता, प्रत्येक सीझनमध्ये दिवसाचे 10 ते 12 तास पाणी आणल्यामुळे आता रमाचे केस गळू लागले आहेत. मान आणि कंबर सतत दुखत असते. तिला मुलं जन्माला घालण्याचीही परवानगी नाही. का? कारण तिला मुलं झाली तर मग पाणी कोण भरणार?

तुकाराम आणि त्यांचा ‘त्रिपत्नी’ परिवार देशाच्या दुष्काळी भागाचं भविष्य दाखवणारा आहे. एक पत्नी घरकाम सांभाळते, तर इतर दोन बायका या फक्त पाणी भरण्याचं काम करतात. 

ही गोष्ट काही वर्षांपूर्वी सुरू होते. तुकारामचं नवं नवं लग्न झालं होतं. सगळं काही ठीक चाललं होतं. सकाळी सकाळी ते कामावर जायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे. पत्नी शांती झाडलोट करायची आणि मग पाणी आणायला निघायची. मग स्वयंपाक करायची आणि पाणी आणायची. मग नवऱ्याची वाट बघत बसायची. त्यानंतर त्यांना एक बाळ झालं. मग दुसरं. मग तिसरं… आणि मग सहावं. आता मात्र तुकारामपुढे वेगळाच प्रश्न उभा राहिला. पाणी आणायला कुणी जायचं?

गावात एक विहीर आहे, पण गरीबाच्या तिजोरीसारखी ती कायमच कोरडी असते. 

तिथं एकही नळ नाही, तलाव नाही. तुकाराम स्वतः पाणी भरत बसेल, तर मग घर चालण्यासाठी पैसे कोण कमावणार? मग गावातल्या इतर अनेकांप्रमाणे तुकारामनेही तोच मार्ग अवलंबला. दुसरं लग्न करण्याचा. पुन्हा एकदा तुकाराम बोहल्यावर चढला आणि पाणी भरणारी पत्नी घरी घेऊन आला. 

भयंकर दुष्काळाचा सामना करणाऱ्या या गावात पाण्यासाठी  लग्न करणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. तुकाराम सांगतात, जेव्हा दुसऱ्या लग्नाचा विचार केला, तेव्हा पहिली पत्नी शांती कित्येक दिवस नाराज होती. आमचं सहावं बाळ जन्म घेणार होतं. पहिल्या पाच मुलांपर्यंत तिनं कसंबसं सहन केलं होतं, मात्र आता परिस्थिती थोडी कठीण झाली होती. वाढलेल्या पोटानिशी कित्येक किलोमीटर पायपीट करत जाणं, विहीरीतून पाणी काढणं अवघड व्हायचं. मुलांना एकमेकांच्या भरवशावर घरात ठेऊन बाहेर जावं लागायचं. घरी येईपर्यंत ती अगदी थकून जायची. 

हे वाचा - #HumanStory : हजारो लोक होते संकटात; रियल लाईफ 'सिंघम'ने असे वाचवले प्राण

मी संध्याकाळी घरी आलो तेव्हा पाहिलं की घरी चूलच पेटलेली नव्हती. किंवा मग चपात्या व्हायच्या आहेत. किंवा मला वाटलं की पिण्यासाठी पाणीच नसेल. गावातील अनेकजण दुसरं, तिसरं लग्न करतात. त्यावेळी मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. शांतीला समजावून सांगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एक दिवस घरातून बाहेर पडलो. परत आलो ते दुसरी बायको घेऊनच. पहिली बायको घर आणि मुलं सांभाळायची, दुसरी बायको पाणी आणायची. गरजा वाढत गेल्या आणि तुकारामचं कुटुंबही. 

आज जवळपास 69 वय असलेल्या तुकारामच्या तीन बायका आहेत. तिघी एकाच घरात, एकाच छताखाली राहतात. तिघींकडे वेगवेगळी कामं आहेत आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. 

तुकारामच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे साखी. तिने तुकारामची दुसरी पत्नी होण्याचा निर्णय कसा घेतला, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. साखीचा पहिला पती कित्येक वर्षांपूर्वी तिला सोडून गेला होता. गावाबाहेर राहणारी साखी विहीरीतून पाणी आणून घरात भरत असे, पण घरी स्वयंपाक करण्यासाठी काहीच नसायचं. 

अशा परिस्थितीत तुकारामनं ‘मोठ्या मनानं’ घातलेली लग्नाची मागणी हे जणू आपल्यावर केलेले उपकारच आहेत, असं तिला वाटत होतं. आता शांती घरात स्वयंपाक करायची आणि साखी घागरी भरभरून पाणी भरायची. 

साखी दररोज जवळपास 60 लिटर पाणी आणायची. सकाळी सुरू केलेलं हे काम करता करता दिवस मावळायचा. काही दिवसांनी ती आजारी पडायला सुरुवात झाली. त्यामुळे तुकारामला तिसरं लग्न करावं लागलं. तिसरी पत्नी रमा ही विधवा होती. तुझं काम फक्त पाणी भरण्याचं आहे, असं तुकारामनं तिला समजावलं. माझ्यासाठी, दोन बायकांसाठी, मुलांसाठी आणि तुझ्यासाठी. 

हे वाचा - #HumanStory : 'व्हीलचेअर हा माझ्या आयुष्याचा शेवट नव्हे, सुरुवात होती'

शांती आताही घरकाम करते आणि स्वयंपाक करते. साखीकडे नवं काम आहे. ती शेतात कामावर जाते आणि मजुरीची कामं करते.तर सुमारे 10 वर्षांपूर्वी आलेली रमा ही घरात पाणी भरण्याचं काम करते. ग्रामपंचायतीला पुरुषांनी तीन-तीन लग्न करण्यावर कधीही कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. 

मी कुठल्याही कमी वयाच्या किंवा तरुण मुलींशी लग्न करून त्यांना कामाला लावलेलं नाही, असं तुकाराम सांगतात. मी त्यांनाच घरी आणलं, ज्या निराधार होत्या. मी त्यांचा संसार पुन्हा वसवला, हे पंचायतीलाही माहित आहे. 

माझ्याशिवाय गावातील बहुतांश पुरुषांनी दोन-दोन लग्न केली आहेत. यात नवं काही नाही आणि चूकही काही नाही. 

तिसरी आणि शेवटची (?) पत्नी रमा रोज 5 ते 6 किलोमीटर गावाबाहेर चालत जाऊन विहीरीचं पाणी आणते. येताना तिच्या डोक्यावर जवळपास 15 लिटरचे दोन कॅन असतात. डोक्यावर हे दोन कॅन ठेऊन आणताना तिच्या हातातही पाण्यानं भरलेली एखादी कळशी किंवा बादली असते. रिकाम्या असलेल्या एका हातानं ती डोक्यावरच्या भांड्यांना आधार देते. परत येताना घरातील मुलं दूरवरूनच हाका मारू लागतात. मग पहिली पत्नी बाहेर येते आणि डोक्यावरून अलगद भांडी उतरून खाली घेते. हे करताना एक थेंबही पाणी वाया जाऊ नये, याची काळजी घेतली जाते. 

पाणी ओतून घेतल्यावर रमा पुन्हा एकदा पाणी आणण्यासाठी परत निघते. काही काही वेळा तिला पाण्यासाठी तीन फेऱ्याही माराव्या लागतात. शेवटच्या फेरीनंतर मनात एकच आशा असते. घरी गेल्यावर जेवण मिळेल आणि झोपण्यासाठी हक्काचं छत. 

आता, प्रत्येक सीझनमध्ये दिवसाचे 10 ते 12 तास पाणी आणल्यामुळे आता रमाचे केस गळू लागले आहेत. मान आणि कंबर सतत दुखत असते. तिला मुलं जन्माला घालण्याचीही परवानगी नाही. 

का? कारण तिला मुलं झाली तर मग पाणी कोण भरणार?

तुकारामचं पूर्ण आयुष्य सरलं, पण अजूनही पाण्याची परिस्थिती तशीच आहे. तुकारामच्या डोळ्यात एक प्रकारची निराशा दिसते. 2013 साली गावातील प्रत्येक घरात ‘सरकारी भांडी’ मिळाली. पाणी साठवण्यासाठी ऍल्युमिनिअमची मोठी मोठी भांडी. पण भांडी देणारे हे सांगत नाहीत की त्यात भरण्यासाठी पाणी कुठून आणायचं?

शेती करायचो. हात पाय मातीनं माखायचे. डोळ्यांना हिरवळ बघण्याची सवय होती. आता आठवड्यातून एकदाच जवळच्या ‘कसारा’ गावात जातो. तिथून भाजीपाला विकत घेतो. तेवढीच काय ती हिरवळ आता डोळ्यांना दिसते. अंगणात मुलं धुळीनं माखलेली असतात. पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी कसंबसं पाणी मिळतं. अशा परिस्थितीत रोज अंघोळ कुणाला परवडेल?

(ठाणे जिल्ह्यातील या गावातील कथानायकाचे नाव बदलण्यात आले आहे.)

First published:

Tags: Human story, Lifestyle, Thane (City/Town/Village), Water