मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#HumanStory : हजारो लोक होते संकटात; रियल लाईफ 'सिंघम'ने असे वाचवले प्राण

#HumanStory : हजारो लोक होते संकटात; रियल लाईफ 'सिंघम'ने असे वाचवले प्राण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

120 च्या स्पीडनं बेळगावकडून हुबळीला चाललेल्या या ट्रेनच्या मोटरमनपर्यंत आमचा इशारा पोहोचत नव्हता. आम्ही ट्रेनकडे चालू लागलो. आमचे श्वास जणू थांबले होते. समोर मृत्यू साफ दिसत होता. पण आम्ही फक्त ईश्वराचा धावा करत पुढे चालत राहिलो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  desk news

मुंबई : मी गेल्या शुक्रवारपासून नीट झोपूही शकलेलो नाही. माझ्या डोळ्यांपुढे आजही ट्रेन, रेल्वे ट्रॅक, पटरी या गोष्टी एकामागून एक फेर धरून नाचत राहतात. रात्रीच्या वेळीही मी अचानक किंचाळून जागा होतो. सर थांबा… सर थांबा… ट्रेन थांबवा…  मग माझी बायको मला समजावते. काहीही झालेलं नाहीय. तुम्ही सगळ्यांना वाचवलं आहे. सगळे लोक ठिक आहेत. मग मला थोडं हायसं वाटतं. त्या दिवशीची परिस्थितीच तशी होती. मृत्यू आमच्या डोळ्यांपुढे होता. पुढच्या काही क्षणांत हजारो लोकांचे प्राण जाणार आहेत, हे स्पष्ट दिसत होतं. मात्र तरीही कुणी पुढे येत नव्हतं. 

गेल्या शुक्रवारी मी मित्रासोबत बाईकवरून चाललो होतो. दुपारचे 12 वाजून 44 मिनिट झाले होते. मेकॅनिककडे जाऊन आम्हाला गाडी ताब्यात घ्यायची होती. आम्ही बेळगावजवळून चाललो होतो. तेवढ्यात आम्हाला दिसलं की तिथं लोकांची मोठी गर्दी जमली आहे. मी आणि तौफीकनंही बाईक थांबवली आणि काय घडतंय, ते पाहू लागलो. 

बाईक थांबवून आम्ही गर्दीच्या पलिकडे पाहिल्यावर काय प्रकार आहे, ते लक्षात आलं. ट्रेनच्या ट्रॅकवर एक भलंमोठं झाड कोसळलं होतं. समोरून त्या झाडाच्या दिशेनंच भरधाव वेगानं ट्रेन येत होती. ते पाहून आम्ही चांगलेच घाबरलो. काहीतरी मोठी दुर्घटना घडू शकते, याचा अंदाज आम्हाला आला होता. तिथं उभे असणारे सगळे व्हिडिओ करण्यातच धन्यता मानत होते. आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण ही दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या दोघांचा जीव गेला तरी चालेल, पण हजारो लोकांचे प्राण तरी वाचतील. 

#HumanStory : 'व्हीलचेअर हा माझ्या आयुष्याचा शेवट नव्हे, सुरुवात होती'

हाच विचार करून आम्ही दोघांनी रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. हाताने ट्रेनच्या मोटरमनला थांबण्याचा इशारा करू लागलो. पण 120 च्या स्पीडनं बेळगावकडून हुबळीला चाललेल्या या ट्रेनच्या मोटरमनपर्यंत आमचा इशारा पोहोचत नव्हता. आम्ही ट्रेनकडे चालू लागलो. आमचे श्वास जणू थांबले होते. समोर मृत्यू साफ दिसत होता. पण आम्ही फक्त ईश्वराचा धावा करत पुढे चालत राहिलो. ट्रेन आमच्यापासून 500 मीटर अंतरावर आल्यावर आम्ही बचावासाठी तिथून बाजूला झालो. 

त्यानंतर आम्ही दोघंही ट्रेनसोबत ट्रेनच्या दिशेनं धावू लागलो. त्यामुळे मोटरमनला इशारा मिळाला की काहीतरी गडबड आहे. मग त्यांनी आपातकालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली. अशा प्रकारे आम्ही ट्रेनमधल्या हजारो जणांचे प्राण वाचवू शकलो. त्यानंतर ट्रेनचालकापासून अनेकांनी आमचे आभार मानले. त्यानंतर आम्ही दोघं एकमेकांना पकडून ढसाढसा रडलो. हे आनंदाचे अश्रू होते. हजारो लोकांचे प्राण वाचवल्याचा आनंद आम्हाला होत होता. या प्रकारामुळे आमचे कुुटुंबीय चांगलेच घाबरले होते, मात्र आज त्यांना याचा अभिमान वाटतो. 

#HumanStory : 'त्या दिवशी मी Jeans घातली नसती, तर आतापर्यंत मेले असते'

(ही गोष्ट बेळगावमध्ये राहणाऱ्या रियाझ सय्यद आणि तौफीक सईद यांची आहे. तौफीक दुधाच्या कारखान्यात काम करतात तर रियाझ कार ड्रायव्हर आहेत. दोघं एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. )

First published:

Tags: Belgaum, Human story, Train, Train driver