मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उत्खननादरम्यान सापडला मानवी कवट्यांचा ढीग

उत्खननादरम्यान सापडला मानवी कवट्यांचा ढीग

मेक्सिकोची (Maxico) राजधानी न्यू मेक्सिकोमध्ये (New Maxico) उत्खनन (Excavation) सुरू असताना मानवी कवट्यांचा (Human Skulls) एक मोठा ढिगारा सापडला आहे. या कवट्या 500 वर्ष जुन्या असून त्या अ‍ॅझटेक साम्राज्याच्या (Aztec Empire) काळातील आहेत.

पुढे वाचा ...
    न्यू मेक्सिको, 14 डिसेंबर: मेक्सिकोची राजधानी न्यू मेक्सिकोमध्ये उत्खनन सुरू असताना मानवी कवट्यांचा एक मोठा ढिगारा सापडला आहे. असं म्हटलं जातं आहे की, या कवट्या 500 वर्ष जुन्या असून त्या अ‍ॅझटेक साम्राज्याच्या काळातील आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अ‍ॅझटेक साम्राज्यात विशाल टॉवर बांधण्यासाठी या लोकांचा बळी दिला असावा. या मानवी कवट्यांच्या ढिगाऱ्यानं संपूर्ण जगाचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. हे उत्खनन पाहण्यासाठी जगभरातील अनेक नामांकित पुरातत्वशास्त्रज्ञही मेक्सिकोला पोहोचले आहेत. मेक्सिको शहरातील उत्खननाच्या प्रकल्पादरम्यान या टॉवरचा शोध लागला. पुरातत्वशास्त्रज्ञांनी आतापर्यंत बळी ठरलेल्या 119 जणांचे मानवी अवशेष शोधले आहेत. 'नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री' या संस्थेनं जाहीर केलं, की हा टॉवर अ‍ॅझटेक साम्राज्याच्या जुन्या राजधानीत सापडला असून या बुरुजात ज्यांचे अवशेष सापडले आहेत, त्यामध्ये मुलं, पुरुष आणि स्त्रियांचाही समावेश आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ राउल बर्रेरा यांच्या मते, 'यापैकी किती लोकं योद्धे होते, हे आम्ही सांगू शकत नाही, कदाचित काहींना बळी देता यावं म्हणून तुरूंगात डांबून ठेवलं असावं. देवतांना खुष करण्यासाठी या लोकांचा बळी देण्यात आला आहे. बॅरेलसारखी रचना असणारा हा टॉवर, मेक्सिको सिटीमधील सर्वात प्रसिद्ध संग्रहालय आणि तत्कालीन साम्राज्याचे मंदिर टेम्पो मेयर जवळ आढळला आहे. सध्याचं मॅक्सिको सिटी शहर जुन्या काळात अॅझटेक साम्राज्याची राजधानी असल्याचं मानलं जातं. त्या काळी हे शहर तेनोच्तितलान या नावानं ओळखलं जात असे. ज्याठिकाणी हा कवटीचा बुरुज सापडला आहे, तेथील आसपासच्या परिसरात यापूर्वीही मानवी शरीराचे प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. यापूर्वीच पुरातत्वशास्त्रज्ञांना अशी अनेक बुरूजं सापडली आहेत, जी 1486 ते 1502 च्या दरम्यान बांधली होती. इतिहासकारांच्या मते,  इसवी सन 1521 मध्ये स्पॅनिश राजा हर्नन कॉर्टेसने या शहरावर हल्ला केला होता, त्यावेळी त्यानं अशा प्रकारच्या अनेक इमारती बांधल्या होत्या. त्या इमारतीमध्ये त्यानं पकडलेल्या सैनिकांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली होती. बहुधा हीच ते योद्धे आणि कैदी आहे, ज्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडत आहेत. मानवी कवट्या सापडलेल्या या टॉवरचा रुंदी जवळपास 5 मीटर एवढी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या