मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अजबच! जो तो येतो याला मारतो; ताणतणावातून बाहेर काढणारी Human Punching Bag

अजबच! जो तो येतो याला मारतो; ताणतणावातून बाहेर काढणारी Human Punching Bag

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ही व्यक्ती मुद्दामहून लोकांचा मार खाते कारण...

  अंकारा, 12 डिसेंबर :  आपल्याला कुणी मारलेलं कुणालाच आवडत नाही. कुणी आपल्याला मारलं की आपणही त्याचा प्रतिकार करतो. पण एक व्यक्ती अशी आहे, जी मुद्दामहून दुसऱ्यांकडून मार खाऊन घेते आणि त्याचा प्रतिकारही करत नाही. त्याला ह्यूमन पंचिंग बॅग (Human Punching Bag) असंही संबोधलं जातं.

  तुर्कस्तानातील हसन रिजा गूने (Hasan Riza Gunay) गेल्या 10 वर्षांपासून स्ट्रेस कोचप्रमाणे (Stress Coach) काम करत आहे. त्यांना तुर्कीतील पहिला स्ट्रेस कोच मानलं जातं. हे ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल की ही व्यक्ती एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाप्रमाणं रुग्णांवर इलाज करते. परंतु, तसं नाही. या व्यक्तीची उपचार करण्याची पद्धत खूप वेगळी असून, याबाबत ऐकल्यावर लोक आश्चर्य व्यक्त करतात. हसन आपल्या क्लायंटचा (Clients) मार खातो आणि त्यामाध्यमातून पैसे कमावतो (Turkey man lets people punch to relieve stress).

  जगात अनेकजण प्रचंड चिंता (Anxiety) करतात. प्रत्येकजण तणाव, त्रास, गोंधळ, काळजी या समस्या वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळतो. काही लोक या समस्या दूर कऱण्यासाठी ध्यानधारणा करतात, काही लोक संगीत ऐकणं पसंत करतात तर काही लोक झोपेच्या माध्यमातून तणाव दूर करतात. मात्र काही लोक असे असतात की जे आरडाओरडा करून, कोणाला तरी मारून आपला राग दूर होतो, असा विश्वास बाळगतात. हसन रिजा गूने गेल्या काही काळापासून अशाच लोकांची मदत करत आहेत.

  हे वाचा - 'या' माशात अडकलाय सर्वांचा जीव! ग्राहक 3 लाख देतायेत तरी मालक विकायला तयार नाही

  जीवनात लोकांना खूप ताणतणाव असतात, असं हसन मानतात. अनेक वेळा आपापसात शेअर करूनही ताणतणाव दूर होत नाहीत. जे आपला राग व्यक्त करू शकत नसल्याने तो मनातच ठेवतात आणि डिप्रेशनचे (Depression) शिकार होतात, अशा लोकांच्या मदतीसाठी ते पुढाकार घेतात. 2010 पासून त्यांनी हे काम सुरू केलं. लोकांमधील ताणतणाव कमी व्हावेत यासाठी लोकांनी मारलं तरी त्यांना कोणतंही प्रत्युत्तर न देता मार खात राहतात.

  हसन यांनी सांगितलं की "दररोज मी 3 ते 4 क्लायंटसोबत 10 ते 15 मिनिटाचं सेशन करतो. या सेशन दरम्यान दुखापत होऊ नये, यासाठी मी काही सुरक्षा उपकरणं परिधान करतो. केवळ मनोरंजन म्हणून मी कोणाचाही मार खायला जात नाही. मी प्रथम संबंधित व्यक्तीची तपासणी करतो. तपासणी दरम्यान मला वाटलं की समोरील व्यक्ती खरोखरच नैराश्यानं ग्रस्त आहे तरच मी पंचिंग थेरपीचा (Punching Therapy) वापर करतो. माझ्या एकूण क्लायंटसपैकी 70 टक्के महिला आणि अनेकदा ऑफिसमध्ये कामामुळे त्रासलेले लोक असतात"

  हे वाचा - ऐकावं ते नवलच! माणसं खातात गुरांचा चारा आणि स्वत:ला समजतात गाय, असाही भयानक आजार

  हसन यांचं नेमकं उत्पन्न किती आहे, याबाबत कोणताही अहवाल किंवा त्यांच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध नाही. परंतु, यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते, असा दावा काही अहवालांमधून करण्यात आला आहे.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle