Home /News /lifestyle /

अरे बापरे! माणसासारखे दात; चक्क माणसांचे प्रायव्हेट पार्ट खातो हा मासा

अरे बापरे! माणसासारखे दात; चक्क माणसांचे प्रायव्हेट पार्ट खातो हा मासा

या माशाला पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

    मुंबई, 16 जून : निसर्गातील अनेक चमत्कार आजही मानवी आकलनाच्या पलिकडचे आहेत. कितीतरी रहस्य अशी आहेत ज्याचा उलगडा झालेला नाही. निसर्गातील असे चमत्कार बघून माणूस थक्क होण्यापलीकडे काही करू शकत नाही. कितीतरी जीव, कितीतरी वनस्पती निसर्गदत्त वैशिष्ट्यांमुळे मानवी बुद्धी समोर आव्हान ठरल्या आहेत. अनेक चित्रविचित्र प्राणी, पक्षी, वनस्पती माणसाला आश्चर्याचा धक्का देत असतात. काही काही एवढेसे जीव किंवा वनस्पती माणसासाठी जीवघेणे असतात. असाच एक समुद्री जीव आहे पाकू मासा (Paku Fish). हा मासा (Pacu fish) बघितला तर असं वाटतं याला माणसाचा जबडा बसवला आहे. ऐकून नवल वाटेल; पण हे खरं आहे. याच्या तोंडात चक्क माणसासारखे दात (Fish teeth like human) असतात. या पाकू माशाच्या जबड्यामध्ये लहान लहान आकाराचे पांढऱ्या रंगाचे दात (White Teath) असतात. त्यामुळे त्यांचं तोंड हुबेहुब माणसांसारखा दिसतं. हे वाचा - OMG! नळाच्या वाहत्या पाण्यालाही त्याने कापलं; VIDEO मध्येच पाहा काय केली कमाल दिसायला विचित्र असणारा हा मासा अतिशय धोकादायकही आहे. हा एवढासा मासा शार्क, व्हेल माशांइतकाच भयंकर आहे. कारण हा मासा चक्क मानवी अवयव खातो. हा मासा स्त्री, पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट (Private Part) खात असल्याचं उघड झालं आहे. डेन्मार्कमध्ये एका व्यक्तीचं गुप्तांग या माशानं खाल्ल्याचं नॅशनल जिओग्राफिकनं (National Geographic) म्हटलं आहे. या माशाला जगातील सर्वात विचित्र आणि धोकादायक मासा मानलं जातं. याला बॉल कटर (Ball Cutter), नट क्रॅकरही (Nut Cracker) म्हटलं जातं. त्यामुळं ज्या भागात हा मासा आढळतो तिथं पोहण्यास मनाई करण्यात येते. हे वाचा - काय सांगता! इथं खरंच येतो 'जादू'?; सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस होतात बंद रिपोर्टनुसार हा पाकू मासा मुख्यतः अॅमेझॉन नदीत आढळतो. त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेसह ब्राझील, स्कँडेनेव्हीया, पॅरीस, ओशिनिया या भागातही हा मासा आढळतो. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील डेलरान सिटीतील एका तलावात मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला हा मासा सापडला. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात अनेक ठिकाणी नद्यांमध्ये, तलावामध्येही हा मासा आढळल्याचं समजत आहे. पिरान्हाच्या जातकुळीतील हा मासा त्याच्या तुलनेत थोडा कमी धोकादायक आणि शांत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काळ्या, लाल रंगाचा हा मासा असतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fish, Shocking news, Viral, Viral news

    पुढील बातम्या