जगात पहिल्यांदाच कोरोनाविरोधात होणार धोकादायक ट्रायल; मानवी शरीरात मुद्दाम सोडणार जीवघेणा व्हायरस

जगात पहिल्यांदाच कोरोनाविरोधात होणार धोकादायक ट्रायल; मानवी शरीरात मुद्दाम सोडणार जीवघेणा व्हायरस

जो कोरोनाव्हायरस (coronavirus) शरीरात जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे, आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. तोच व्हायरस मुद्दामहून शरीरात टाकण्याचं नेमकं काय कारण आहे समजून घ्या.

  • Share this:

लंडन, 24 सप्टेंबर : जगभरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण कोरोनाव्हायरसपासून बचावाचा प्रयत्न करत आहे, सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देत आहे. डॉक्टरही नागरिकांना कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सल्ले देत आहेत. कोरोना शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्वकाही केलं जातं आहे. असं असताना यूकेमध्ये मात्र मुद्दामहून कोरोनाव्हायरस माणसांच्या शरीरात सोडला जाणार आहे.

यूके सरकार ह्युमन चॅलेंज स्टडी (human challenge studies) करण्याचा विचार करत आहे. कोरोना लशीचा (corona vaccine) परिणाम आणि प्रभाव तपासण्यासाठी challenge trails केलं जाणार आहे. ज्या निरोगी व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यांच्या शरीरात  कोरोनाव्हायरस सोडला जाईल. लंडनमध्ये हा प्रयोग केला जाणार असं सांगितलं जातं आहे.  कोरोनाव्हायरस मुद्दाम शरीरात सोडणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश असावा. बीबीसीने फायनान्शिअल टाइम्सचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. याबाबत कोणताही अधिकृत करार झाला नसल्याचंही बीबीसीने सांगितलं आहे.

इंजेक्शनशिवाय लस देण्याचा प्रयत्न

सध्या ज्या लशींचं ट्रायल सुरू आहे किंवा ज्या लशी तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतेक लशी इंजेक्शनमार्फत देता येतील अशा आहेत. मात्र इंजेक्शनशिवाय लस देण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. लस अधिक प्रभावी ठरावी यासाठी नाकावाटे दिली जाणारी लसही तयार करण्यात आली आहे. अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स (Codagenix Inc.) या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असं या लशीचं नाव आहे. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. या लशीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत. सीरम इन्स्टिट्युटला या लशीचं भारतात उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

हे वाचा - निगेटिव्ह आल्यानंतरही भारतीयांना दुसऱ्यांदा होतोय कोरोना, यावेळी प्रकृती गंभीर

तर ऑस्ट्रेलियातही शास्त्रज्ञांनी सुईशिवाय कोरोनाची लस तयार केली आहे. आता या लसीची चाचणी सुरू होईल. ही लस डीएनएवर आधारित आहे आणि त्याच्या चाचणीसाठी 150 लोकांनी त्यांची नावं पाठवली आहेत. सिडनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तयार केलेली ही कोरोना लस एअर जेट मशीनद्वारे रुग्णांच्या त्वचेवर टोचली जाईल. हे डिव्हाइस फार्माजेट म्हणून ओळखले जाते.

डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग यांची टीम ही लस तयार करत आहे. मॅनसबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्माजेटद्वारे दिलेली लस इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. एअर जेट सिस्टममुळे वेदना होतच नाही असे नाही. मात्र यामुळे सुई लावल्यानंतर त्वचेवर होणारी इजा कमी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारने ही लस विकसित करण्यासाठी 30 लाख डॉलर्सचा निधी जाहीर केला.

लशीच्या वितरणासाठी WHO ने तयार केली यंत्रणा

जागतिक आरोग्य संघटना कोरोना लस विकसित करण्यासाठी जोडलेल्या जागतिक समूह आणि सीइपीआयसह समन्वय करीत आहे. भविष्यात देशांमध्ये लशीचं समान वितरण करण्यासाठी कोवॅक्स नावाची एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

हे वाचा -  एक खेकडा; कोरोना लशीत निभावणार महत्त्वाची भूमिका

आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी सांगितले की, कोवॅक्स ही लशीच्या विकासाला सक्षम बनवते आणि विविध देशांच्या नागरिकांपर्यंत प्रभावी लस पोहोचली जावे याची यात्री करता येते.

Published by: Priya Lad
First published: September 24, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading