मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /काय सांगता! हा खास Beetroot Juice पिताच मरतात Mosquitoes

काय सांगता! हा खास Beetroot Juice पिताच मरतात Mosquitoes

डासांचा खात्मा करण्याचा एक नवा मार्ग सापडला.

डासांचा खात्मा करण्याचा एक नवा मार्ग सापडला.

डासांचा खात्मा करण्याचा एक नवा मार्ग सापडला.

  स्टॉकहोम, 20 ऑक्टोबर : डास (Mosquitoes) हे अनेक विषाणूजन्य रोगांचे वाहक (Spreaders of Viral Diseases) आहेत. त्यामुळे जगभर वेगवेगळ्या भागांत डेंग्यू (Dengue), चिकनगुनिया (Chikungunya), मलेरिया (Malaria) यांसारख्या वेगवेगळ्या रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे डासांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. डासांच्या माध्यमातून होणारा रोगप्रसार कमी करण्यासाठी सुरू असलेल्या एका संशोधनातून डासनियंत्रणाचा (Mosquito Control) एक नवा मार्ग पुढे आला आहे. शास्त्रज्ञांनी एक खास बीटरूट ज्युस (Beetroot Juice)  तयार केलं आहे, जे पिताच डास मरतात.

  हे बीट ज्यूस (Beetroot Juice for Mosquito ) म्हणजे डासांसाठी विषारी ब्लड मील (Toxic Blood Meal) आहे. मानवी रक्ताऐवजी डास तिकडे आकर्षित होतील. त्यामुळे माणसांना न चावता डास ते विषारी ज्यूस पितील आणि त्यांची संख्या घटेल. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारांची संख्याही कमी होईल.

  स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या (Stockholm University) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, HMBPP सप्लिमेंटेड बीटरूट ज्यूस डास पिऊ शकतात किंवा पितात. HMBPP हे प्लाझ्मोडियम या मलेरिया परजीवीने तयार केलेलं मेटाबोलाइट आहे. डासांना आकर्षित करण्यासाठी त्याच्या साह्याने कृत्रिम ब्लड मील तयार करता येईल. त्यामुळे डास नैसर्गिकरीत्याच माणसांना चावण्याऐवजी या कृत्रिम द्रव्यावर येतील.

  हे वाचा - हिवाळ्यात किती धोकादायक ठरू शकतो कोरोनाव्हायरस?

  मलेरिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून ज्या प्रकारचा गंध येतो, तशाच प्रकारचा गंध बीटरूट ज्यूसमध्ये वापरलेल्या HMBPP ला येतो. त्यामुळे डास तिकडे आकर्षित होतात. HMBPP चा वापर करून तयार केलेलं हे गुलाबी ज्यूस म्हणजे डासनियंत्रणासाठी पर्यावरणसुसंगत उपाय आहे आणि ते मादी डासांसाठी नैसर्गिकरीत्या विषारीही आहे. स्टॉकहोम युनिव्हर्सिटीतल्या दी वेनरग्रेन इन्स्टिट्यूटमधल्या मॉलिक्युलर बायोसायन्सेस विभागातले सहयोगी प्राध्यापक नौशिन इमामी यांनी ही माहिती दिली.

  मिरचीमध्ये आढळणारं कॅप्सिसिन, तसंच सॅव्हरी ऑइल, बोरिक अॅसिड आणि फिप्रोनिल सल्फोन हे कीटकनाशक अशा चार विषारी द्रव्यांचा आणि वर उल्लेख केलेल्या मीलचा तुलनात्मक अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. त्यात असं आढळलं, की या ज्यूसवर डास नैसर्गिकरीत्या येऊन बसतात आणि फीडिंग केल्यानंतर 100 ते 350 मिनिटांमध्ये मरून पडतात. हे ज्यूस स्प्रेच्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून त्याचं मार्केटिंग केलं, तर घरांजवळची डासांची संख्या नियंत्रणात आणता येऊ शकेल.

  नौशिन यांनी सांगितलं, 'डासांच्या नियंत्रणासाठी अनेक नवनवी आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तंत्रं विकसित होत आहेत. मोठ्या पातळीवर त्यांच्या चाचण्याही होत आहेत; मात्र साधे-सोपे, पण प्रभावी, सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध असलेले उपाय विकसित करणं आवश्यक आहे. तो मुद्दा सिद्ध करण्यासाठीच आम्ही या प्रयोगात बीटरूटचा वापर केला.'

  हे वाचा - ताप डेंग्यूचा आहे की कोरोनाचा? या लक्षणांद्वारे ओळखून वेळीच करा उपचार

  मलेरियाशी दिल्या जात असलेल्या लढ्यासंदर्भात या महिन्यात मिळालेली ही दुसरी सकारात्मक बातमी आहे. मलेरिया होण्याची जोखीम असलेल्या मुलांसाठी मलेरिया प्रतिबंधक लस विकसित झाली असून, तिची शिफारस याच महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने केली होती.

  ही शिफारस घाना, केनिया आणि मालावीमध्ये सुरू असलेल्या पथदर्शी कार्यक्रमाच्या निष्कर्षांच्या आधारे करण्यात आली आहे. 2019 पासून तिथे आठ लाख मुलांचं लसीकरण करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधानोम घेब्रेयेसस यांनी सांगितलं, की हा ऐतिहासिक क्षण आहे. मलेरियावरच्या लहान मुलांसाठीच्या लशीची दीर्घ काळ प्रतीक्षा होती. हे विज्ञानातलं मोठं यश आहे. या लशीमुळे मलेरियाचा प्रतिबंध करून दर वर्षी लाखो मुलांचे प्राण वाचवता येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle, Serious diseases