मुंबई, 3 फेब्रुवारी : तुम्ही काही मुलींना कमरेभोवती रिंग फिरवताना पाहिलंय का? या हुला हुपिंग (Hula Hooping) असं म्हटलं जातं, हा एक व्यायामाचा प्रकार आहे. हुला हूप करणाऱ्या या मुलींची कंबर एकदम लवचिक असते. हुला हूप हा कमरेचा घेर कमी करणारा एक उत्तम व्यायाम आहे. तुम्हालाही पोटाची ढेरी कमी करायची आहे, मात्र इतर व्यायाम करायचा कंटाळा आला आहे. तर हा मजेशीर व्यायाम तर तुम्ही नक्कीच करू शकता. हुला हूप केल्याने भरपूर घाम येतो, हृदयाचे ठोके वाढतात, फुफ्फुसाचं कार्य वाढतं. आठवड्यातील काही दिवस 20 मिनिटांपर्यंत हुला हुप वापरणं तुमच्या फिटनेससाठी खूप फायदेशीर ठरेल. हुला हूप करण्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
पोटाचा घेर कमी होतो
तुम्हाला फक्त पोट आणि कमरेचा घेर कमी करायचा असेल, तर हुला हुप हा चांगला पर्याय आहे. हुला हुप कमरेभोवती फिरवत राहिल्यानं कमरेचे स्नायू कार्यरत राहतात. नियमित असं केल्यानं पोटाचा आणि कमरेचा घेर कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी होतं
वजन घटवायचं असेल, तर भरपूर प्रमाणात कॅलरीज घटवायला हव्यात. त्यासाठी अनेकदा तज्ज्ञ एरोबिक किंवा हृदयासाठी फायदेशीर असा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. हुला हुपमुळे तुमच्या अनावश्यक कॅलरीज कमी होण्यास मदत होते.
हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो
हुला हुप हा एकप्रकारे एरोबिक व्यायाम आहे, जो हृदयासाठी फायदेशीर ठरतो. हुला हुपिंग हायरपटेंशन किंवा उच्च रक्तदाब दूर ठेवण्यास मदत करतं, तसंच वाईट कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते. उच्च रक्तदाब आणि कामी वाईट कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी हृदयाचे आजार बळावण्यास कारणीभूत ठरतात.
शरीर स्थिती सुधारते
तुमची शरीर स्थिती चांगली असल्यास तुम्ही चांगले दिसता. तसंच शरीराची स्थिती योग्य नसल्यास सांधेदुखी बळावू शकते. मान, खांदा आणि पाठीत वेदना उद्भवू शकतात. हुला हुपमुळे तुमची बसण्याची आणि उभं राहण्याची स्थिती सुधारते.
मूड सुधारतो
हुला हुप हा एकप्रकारे मजेशीर व्यायाम आहे. एखाद्या म्युझिकसोबत तुम्ही हे खेळल्यास यातील मजा द्विगुणित होते. यामुळे तुमचा मूड सुधारतो. चिडचिड किंवा डिप्रेशन असल्यास हुला हुप वापराल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
अन्य बातम्या
थंडीत अंथरूणातून बाहेर पडावंसं वाटत नाही, मग असं राहा फिट
वजन कमी करण्यासाठी डाएट करताय तर सावधान ! तज्ज्ञही सांगतात ‘हा’ डाएट करू नका