Home /News /lifestyle /

मला CORONA VACCINE मिळणार की नाही? इथं वाचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर

मला CORONA VACCINE मिळणार की नाही? इथं वाचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर

कोरोना लशीकरणासाठी (CORONA VACCINATION) मोदी सरकारनं प्राधान्यक्रम ठरवला आहे. या यादीत तुमचा समावेश आहे का? तुम्हाला कोरोना लस मिळणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

    मुंबई, 25 डिसेंबर : पुढच्या वर्षी कोरोना लस (CORONA VACCINE) येणार याची उत्सुकता सर्वांना आहे. प्रत्येक जण कोरोना लशीची (COVID 19 VACCINE) प्रतीक्षा करणार आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला कोरोना लस हवी आहे. मात्र सरकारनं कोरोना लशीकरणासाठी (CORONA VACCINATION) काही नियमावली तयार केली आहे. लशीकरणासाठी (COVID 19 VACCINATION) प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. सरकारच्या या यादीत तुमचा समावेश आहे का? तुम्हाला कोरोना लस मिळणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कोरोना लस कुणाला मिळणार, यासाठी कोण पात्र आहे याबाबत केंद्र सरकारनं सविस्तर माहिती दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना कोरोना लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोना लशीकरणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन नसल्यास कोरोना लस मिळणार नाही. कारण या नोंदणीनंतरच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लशीकरणाबाबत मेसेज येईल.  जे लोक लशीकरणासाठी पात्र ठरणार आहेत, त्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईलवर मेसेज करून माहिती दिली जाणार आहे. लशीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाणही कळवलं जाणार आहे. हे वाचा - Covid-19 लशीबाबत चिंता वाढवणारी बातमी! अ‍ॅलर्जीचे प्रकार आले समोर कोरोना लशीकरण नोंदणीसाठी खालीलपैकी एखादं ओळखपत्रं  तुम्हाला द्यावं लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पोस्ट ऑफिस किंवा बँकेचे पासबुक पासपोर्ट पेन्शन डॉक्युमेंट्स कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत देण्यात आलेलं हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड MGNREGA जॉब कार्ड हे वाचा - दर महिन्याला 2 रूपं,कोरोना आणखी नवा अवतार घेणार; AIIMS च्या संचालकांची केलं सावध आमदार, खासदार असल्यास ते ओळखपत्रं सरकारी किंवा खासगी कंपनीत नोकरी करत असल्यास तिथलं ओळखपत्रं वोटर आयडी फोटो आयडी नोंदणी करताना आणि लस घेतानाही Photo ID बंधनकारक आहे. लशीकरण पूर्ण झाल्यानंतरही त्या संबंधित व्यक्तीला मेसेज पाठवला जाईल. तसंच QR code वर आधारित एक सर्टिफिकेटही पाठवलं जाईल. जो लस घेतल्याचा पुरावा असेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या