आपलं काम करून घेण्यासाठी बायकोचा अनोखा फंडा! नवऱ्याला तर शॉकच बसला

आपलं काम करून घेण्यासाठी बायकोचा अनोखा फंडा! नवऱ्याला तर शॉकच बसला

नवऱ्याकडून घरातील किंवा आपलं वैयक्तिक काम कसं करून घ्यायचं याचे बरेच फंडे बायकोकडे असतात. असाच एक फंडा सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी :  भल्या भल्या लोकांचं पत्नीसमोर (wife) काहीच चालत नाही. बाहेर ते कितीही मोठे बॉस असले तरी घरातील बॉस ही बायकोच असते. ही काळ्या दगडावरील रेख म्हटलं तरी हरकत नाही. नवऱ्यांकडून (husband) काम कसं करून घ्यायचं हे प्रत्येक बायकोला माहिती असतं. नवऱ्याची दुखती नस पकडून बायको बरोबर त्याला कामाला लावते. मग ते एखाद्या गोष्टीचं आमिष असो किंवा इमोशनल ब्लॅकमेल असो. त्यांच्याकडे नवऱ्याकडून घरातील किंवा आपलं वैयक्तिक काम कसं करून घ्यायचं याचे बरेच फंडे त्यांच्याकडे असतात. असाच एक फंडा सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीनं तिचं काम त्याच्याकडून कसं करून घेतलं, तिनं काय शक्कल लढवली याचा अनुभव शेअर केला आहे. @DocAtCDI ट्विटर युझरनं हे ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यानं आपल्या बायकोनं आपल्याला कामाला लावण्यासाठी काय केलं हे सांगितलं आहे.

ट्विटमध्ये म्हटलं आहे. "मी आणि माझी बायको एकत्र टीव्ही पाहत बसलो होतो. इतक्यात मला मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज आला. तेव्हा मला आठवलं की मी मोबाईल किचनमध्येच विसरलो आहे. मी उठलो आणि मोबाईल आणण्यासाठी किचनमध्ये गेलो आणि पाहतो तर काय तो मेसेज माझ्या बायकोचा होता. प्लीझ येताना चिप्स घेऊन ये". मेसेज पाहून नवऱ्याला शॉकच बसला.

हे वाचा - VIDEO काढण्याच्या नादात बिबट्याच्या जवळ गेला आणि... काळजाचा ठोका चुकवणारं दृश्यं

हे ट्वीट वाचून यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. हे ट्वीट पाहून अशा परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या पुरुषांना तर रडूच कोसळलं असावं आणि त्यांचे अविवाहित मित्र त्यांची मजा घेत असावेत.

काही नेटिझन्सनी तर बायकोच्या या फंड्याला दाद दिली आहे.  काहींनी तिला जिनीअस म्हणत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी चेकमेट करण्यासाठी हा मास्टर मुव्ह असल्याचं म्हटलं. काहींनी महिलांनी तर आपणही आपल्या पतीवर हाच फंडा वापरणार असल्याचंही ठरवलं आहे. आता यामध्ये तुमची बायको तर नाही ना, हे एकदा पाहा.

Published by: Priya Lad
First published: January 14, 2021, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading