Home /News /lifestyle /

Weight Loss Tea: दालचिनीसोबत घरातीलच या गोष्टी घालून बनवा स्पेशल चहा; झपाट्यानं वजन होईल कमी

Weight Loss Tea: दालचिनीसोबत घरातीलच या गोष्टी घालून बनवा स्पेशल चहा; झपाट्यानं वजन होईल कमी

Cinnamon And Honey For Weight Loss: अनेक प्रयत्न करूनही काहींना वजन कमी (Weight Loss tips) करता येत नाही. अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि मधाचा उपयोग करू शकता. दालचिनी आणि मधामध्ये लठ्ठपणा कमी करणारे घटक असतात.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर : फिटनेस आणि फॅशनच्या या जमान्यात प्रत्येकाला स्लिम दिसायचं असतं. वजन कमी (Weight Loss) असणाऱ्यालाही सडपातळ दिसायचं आहे. मग, ज्यांचे वजन खरोखर जास्त आहे, अशा लोकांची वजन कमी करण्याची इच्छा तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता. अनेक प्रयत्न करूनही काहींना वजन कमी (Weight Loss tips) करता येत नाही. अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि मधाचा उपयोग करू शकता. दालचिनी आणि मधामध्ये लठ्ठपणा कमी करणारे घटक असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित करता येते आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. या दोन गोष्टींचा वापर कसा करायचा ते जाणून (Cinnamon And Honey For Weight Loss) घेऊया. दालचिनी आणि मधाचा चहा वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि मधाचा चहा घेऊ शकता. यासाठी दीड कप पाण्यात एक इंच दालचिनीचा तुकडा टाकून साधारण पाच मिनिटे उकळवा. नंतर एका कपामध्ये गाळून घ्या. आता त्यात दोन चमचे मध मिसळा आणि सामान्य चहाप्रमाणे हळूहळू सेवन करा. तुम्ही रोज हा एक कप चहा घेऊ शकता. हे वाचा - Oppo आणि Xiaomi ग्रुपविरोधात आयकर विभागाची मोठी कारवाई, अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी छापेमारी दालचिनी-मध-लिंबू यासाठी एका भांड्यात दीड कप पाणी उकळून घ्या. यानंतर एका कपमध्ये चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर, दोन चमचे मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. यानंतर, हे उकळलेले पाणी कपमध्ये घालून चांगले मिसळा. मग ते सिप करून प्या. हा चहा दिवसातून एकदा घेऊ शकता. हे वाचा - Year Ender : वर्ष 2021 मध्ये आरोग्याशी संबंधित या 7 वस्तू सर्वाधिक विकल्या गेल्या, वाचा सविस्तर ग्रीन टी - दालचिनी आणि मध वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि मधासोबत ग्रीन टीचीही मदत घेऊ शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दीड कप पाणी उकळून घ्या. त्यानंतर या पाण्यात एक चमचा ग्रीन टी टाका आणि पुन्हा दोन मिनिटे उकळा. आता एका कपमध्ये एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर घाला आणि त्यात दोन चमचे मध मिसळा. नंतर हे ग्रीन टी पाणी एका कपमध्ये मध आणि दालचिनी असलेल्या गाळून घ्या आणि सर्वकाही चांगले मिसळा, त्यानंतर त्याचे सेवन करा. तुम्ही दररोज एक कप सेवन करू शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. )
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Weight, Weight loss tips

    पुढील बातम्या