Home /News /lifestyle /

Jaggery For Winter : हिवाळ्यात Skin Care वर पैसे खर्च करण्यापूर्वी एकदा अशा पद्धतीनं गूळ वापरून पाहा

Jaggery For Winter : हिवाळ्यात Skin Care वर पैसे खर्च करण्यापूर्वी एकदा अशा पद्धतीनं गूळ वापरून पाहा

Jaggery For Winter Skin Care : थंडीच्या काळात गुळाचा आरोग्यालाच नव्हे तर त्वचेलाही अनेक प्रकारे फायदा होतो. त्वचेवर गुळाचा वापर केल्याने त्वचा चमकदार तर होतेच पण काळी वर्तुळे आणि टॅनिंगसारख्या समस्यांपासूनही कमी होतात.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : थंडीच्या (Winter) मोसमात त्वचेची काळजी (Skin care) घेणे खूप गरजेचे असते, कारण या ऋतूत त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज होते. त्वचा मुलायम आणि ग्लोइंग करण्यासाठी लोक ब्युटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करतात. किंवा घरबसल्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट्स ऑर्डर करून वापरतात. पण, तुम्‍हाला माहीत आहे का की, हिवाळ्यात आपण त्वचेची काळजी घेण्‍यासाठी जास्त खर्च न करता गुळाचाही (Jaggery) वापर करू शकता. हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे अनेकांना माहीत आहे. थंडीच्या काळात गुळाचा आरोग्यालाच नव्हे तर त्वचेलाही अनेक प्रकारे फायदा होतो. त्वचेवर गुळाचा वापर केल्याने त्वचा चमकदार तर होतेच पण काळी वर्तुळे आणि टॅनिंग सारख्या समस्यांपासूनही कमी होतात. जाणून घेऊयात गुळाचा वापर (Jaggery For Winter Skin Care) चेहऱ्यावर कसा करता येईल. गुळाचा फेस पॅक त्वचा चमकदार आणि मुलायम बनवेल त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही गुळाचा फेस पॅक वापरू शकता. यासाठी तुम्ही एक चमचा गूळ घ्या. नंतर त्यात एक चमचा मध आणि एक चमचा कोरफडीचे जेल मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुण्यापूर्वी पाच मिनिटे मसाज करा, नंतर पाण्याने स्वच्छ करा. हे वाचा - White Hair : पांढऱ्या केसांवर हा घरगुती उपाय आहे जबरदस्त, गुळासोबत खा हा पदार्थ काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी गुळाचा फेस पॅक गुळाचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन, एक चमचा देशी तूप, अर्धा चमचा मध, एक चमचा दही आणि चतुर्थांश चमचा गूळ लागेल. हा पॅक बनवण्यासाठी प्रथम या सर्व गोष्टी एका भांड्यात ठेवा. नंतर ते सर्व चांगले मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. यानंतर, ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हलक्या हातांनी गोलाकार हालचालीने पाच मिनिटे मालिश करा. यानंतर, हा पॅक वीस मिनिटांसाठी तसाच ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे वाचा - फक्त उसाचाच नव्हे इतक्या प्रकारचे असतात गुळ; तुमच्या आरोग्यासाठी कोणता आहे सर्वात योग्य (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Skin, Skin care

    पुढील बातम्या