मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हीही केसांसाठी वारंवार वापरता कंडिशनर? मग या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक

तुम्हीही केसांसाठी वारंवार वापरता कंडिशनर? मग या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक

कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते. मात्र केसांना कंडिशनर लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. (Hair Conditioner)

कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते. मात्र केसांना कंडिशनर लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. (Hair Conditioner)

कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते. मात्र केसांना कंडिशनर लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. (Hair Conditioner)

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 05 सप्टेंबर : केस (Hair) आणि त्वचेची (Skin) विशेष काळजी घेण्यासाठी लोक सहसा विविध प्रकारची उत्पादनं वापरतात. आपले केस आणि चेहरा आकर्षक दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. अलीकडच्या काळात विविध कारणांमुळे केसांविषयक समस्या वाढलेल्या दिसतात. अनेक महिला आणि पुरुष केस गळण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. काही पुरुषांना अकाली टक्कल पडतं. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी शाम्पू, कंडिशनर आदींचा वापर करण्याकडे कल वाढलेला आहे. केसांची निगा राखण्यासाठी शाम्पूने (Shampoo) केस धुतल्यानंतर कंडिशनरचा (Conditioner) वापर करणं ही बाब सर्वसामान्य मानली जाते.

कंडिशनरच्या वापरामुळे केस मुलायम आणि निरोगी राहण्यास मदत होते. मात्र केसांना कंडिशनर लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. सहसा आपले केस शाम्पूने धुतल्यानंतर स्वच्छ होतात. तथापि, शाम्पू केल्यावर कंडिशनर न लावल्यास केस कोरडे (Dry), कुरळे आणि निर्जीव होतात. कंडिशनरच्या बाबतीत काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही केसांच्या स्थितीनुसार कंडिशनरचा वापर केला तर तो निश्चितच फायदेशीर ठरतो. योग्य कंडिशनर वापरल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात.

Workout Outfit Idea : हे आहेत वर्कआउटसाठी काही परफेक्ट आउटटफिट्स, मिळेल कूल आणि कम्फर्टेबल लूक

कंडिशनर लावण्याचे फायदे

1. कंडिशनर लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि त्यांचं पोषण होतं.

2. या व्यतिरिक्त कंडिशनरसोबत तेल आणि सिलिकॉन वापरलं तर केसातील घटकांचं संतुलन राखण्यास मदत होते.

3. कंडिशनर लावल्याने केस मुलायम (Silky) आणि चमकदार राहतात.

कंडिशनर का वापरावा?

केसांमध्ये नैसर्गिक कंडिशनर आधीपासूनच असतो, ही बाब कदाचित तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल. तथापि, वारंवार केस धुतल्यानं ते कमी होतं. परिणामी केस कोरडे आणि कडक होतात. अशावेळी शाम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरल्यास केसांमधील मॉईश्चर कायम राहतं आणि नैसर्गिक कंडिशनर कमी होत नाही.

Neck Rashes Remedy : बाळाच्या मानेवर वारंवार येतात पुरळ? मग करून पाहा हे 5 घरगुती उपाय

कंडिशनर कसा वापरावा?

स्टेप 1. - तुमच्या केसांच्या प्रमाणानुसार कंडिशनर तुमच्या तळहातावर घ्या.

स्टेप 2.- ते केसांच्या टोकांना लावा.

स्टेप 3.- तीन मिनिटांनी केस स्वच्छ पाण्यानं धुवा.

केसांचं आरोग्य (Health) चांगलं राहण्यासाठी योग्य प्रकारचे कंडिशनर्स वापरा. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार कंडिशनर निवडा. केसांना स्टाइल करण्यापूर्वी लिव्ह-इन कंडिशनर वापरणं चांगलं ठरू शकतं.

कंडिशनरची निवड कशी कराल?

जर तुमचे केस अत्यंत कोरडे आणि निर्जीव असतील तर तुमच्यासाठी हायड्रेटिंग कंडिशनर हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्याचप्रमाणे जर तुमचे केस तेलकट (Oily) असतील, तर तुम्ही लाइट कंडिशनर वापरावा. पातळ केसांसाठी व्हॉल्युमायझिंग कंडिशनर वापरणं फायद्याचं ठरतं.

First published:

Tags: Woman hair