Home /News /lifestyle /

Black Turmeric: काळी हळद हेल्दी तर आहेच; स्कीनसाठीही तिचा असा होतो फायदा

Black Turmeric: काळी हळद हेल्दी तर आहेच; स्कीनसाठीही तिचा असा होतो फायदा

काळी हळद पिवळ्या हळदीपेक्षा खूपच कमी वापरली जाते, परंतु औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळी हळद आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर (Black Turmeric Benefits for Skin) आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 16 मे : साधारणपणे आपल्या सर्वांना हळदीचे गुणधर्म माहीत असतीलच. जेवणाची चव वाढवण्यापासून ते त्वचेची निगा राखण्यासाठी पिवळ्या हळदीचा वापर सर्रास केला जातो, पण काळ्या हळदीबद्दल (Black Turmeric) तुम्ही कधी ऐकले आहे. अर्थातच, काळी हळद पिवळ्या हळदीपेक्षा खूपच कमी वापरली जाते, परंतु औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळी हळद आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर (Black Turmeric Benefits for Skin) आहे. काळी हळद हे परदेशी उत्पादन नाही, काळी हळद देशात अनेक ठिकाणी सहज उपलब्ध आहे. अँटीऑक्सिडंटने समृद्ध काळी हळद त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास प्रभावी ठरते. जाणून घेऊया काळ्या हळदीचा त्वचेची काळजी घेण्यासाठी कसा वापर करता येईल. काळी हळद आणि मधाचा फेस पॅक काळी हळद आणि मध यांचे मिश्रण उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. यासाठी 1 चमचा काळ्या हळदीमध्ये 1 चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. नंतर 20 मिनिटे कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक येईल. गुलाब पाणी आणि काळी हळद - पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळद देखील चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी उपयुक्त आहे. 1 चमचा काळी हळद पावडरमध्ये 1 चमचा गुलाबपाणी घालून मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा ताज्या पाण्याने धुवा. हा फेसपॅक नियमित वापरल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील. हे वाचा - केसांच्या सगळ्या समस्यांवर एकमेव जालीम उपाय; काळे हरभरे अशा पद्धतीनं वापरून बघा काळी हळद आणि कोरफडीचा फेस पॅक उन्हाळ्यात पिंपल्स आणि मुरुमांची समस्या जास्त होते. त्यावर आपण काळ्या हळदीचा फेस पॅक देखील वापरून पाहू शकता. यासाठी 1 चमचा काळ्या हळदीमध्ये 1 चमचा ताजा कोरफडीचे गर मिसळा. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हे वाचा - आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या