Home /News /lifestyle /

Ration Card Update: रेशन कार्डवर मुलांची नावं कशी करायची अपडेट?

Ration Card Update: रेशन कार्डवर मुलांची नावं कशी करायची अपडेट?

How to update Ration card: रेशन कार्ड अजूनही आवश्यक कागदपत्रांच्या यादीत येतं. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं या कार्डवर असणं अत्यंत आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 11 जानेवारी ः  रेशन कार्ड (Ration Card) हे अनेक नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज (important document) आहे. यात नोंदवलेल्या माहितीच्या आधारावर नागरिकांना अन्नधान्य (Ration) सवलतीच्या दरात दिलं जातं. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा (government schemes) लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. हा कायदेशीर मान्यताप्राप्त दस्तावेज असून, यावरील ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. अशावेळी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, तुमचं रेशन कार्ड अपडेटेड (Ration Card Update) असणं आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबात मूल जन्माला आलं किंवा दत्तक घेतलं, तर त्याचंं नाव रेशन कार्डमध्येही सामाविष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. टीव्ही 9 हिंदी ने याबाबत वृत्त दिलं आहे. रेशन कार्डधारकांना (Ration card Holder) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार रेशन मिळते. तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल, तर तुम्हाला माहिती असेलच की रेशन दुकानातून युनिटनुसार रेशन दिले जातं. म्हणूनच तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं या कार्डवर असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला रेशन कमी मिळेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं किंवा मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल, तर ते आताच अपडेट करा. रेशन कार्डमध्ये असलेली माहिती तपासण्यासाठी, बदलण्यासाठी किंवा एखादे नाव सामाविष्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर (national food security portal) जावे लागेल. हे वाचा -  वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? आहारात या 5 फळांचा समावेश ठरेल परिणामकारक नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलला भेट देऊन तुम्ही रेशन कार्डमध्ये नवीन नाव सामाविष्ट करू शकता. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल. त्यासोबत आवश्यक कागदपत्रं सादर करावी लागतील. तुमचा अर्ज व कागदपत्रांची संबंधित अधिकाऱ्याने तपासणी केल्यानंतर व ती योग्य असल्यानंतर रेशन कार्डमध्ये संबंधित नाव सामाविष्ट होईल. चला तर मग रेशन कार्डमध्ये तुमच्या मुलांची नावे सामाविष्ट करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहूया. - मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये सामाविष्ट करण्यासाठी सर्वात प्रथम कुटुंबप्रमुखाचा (head of the family) पासपोर्ट आकाराचा फोटो ( Passport size Photo) आवश्यक आहे. - दुसरा महत्त्वाचा कागद म्हणजे ज्या मुलाचं नाव सामाविष्ट करायचे आहे, त्याच्या जन्माचा दाखला. नोंदणी करण्यासाठी महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेला जन्माचा दाखला आवश्यक असेल. तुमच्याकडे जर मुलाच्या जन्माचा दाखला नसेल, तर सर्वप्रथम तो काढून घ्या. हे वाचा - Corona Immunity booster म्हणून काढा पिताय? तो करताना कधीही करू नका या चुका - आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. ओळखीचा पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जातो. आता तर मुलांचे आधार कार्डदेखील मिळते. याचाच अर्थ तुमच्याकडे तुमच्या मुलाचे आधार कार्डही उपलब्ध असेल. मुलाचे नाव रेशन कार्डमध्ये सामाविष्ट करण्यासाठी या आधार कार्डची फोटो कॉपी आवश्यक आहे. - जर तुम्ही मूल दत्तक घेतलं असेल, तर अशावेळी दत्तक मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये सामाविष्ट करण्यासाठी तुम्हाला मुलाचं दत्तक प्रमाणपत्र आवश्यक आहे. कोरोनामुळे देशात कडक लॉकडाउन लावण्यात आला होता. या काळात रेशन कार्डवर सामान्य नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते. तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. त्यामुळे ते अपडेटेड ठेवणं फायद्याचं ठरतं.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Ration card

पुढील बातम्या