दारू- सिगरेटपासून तुम्ही मुलांना असं ठेवू शकता दूर

असं म्हटलं जातं की, मुलं आपल्या वडिलधाऱ्यांकडे पाहून शिकत असतात. घरात मद्यपान करणारं कोणी असेल तर त्याचं अनुसरण मुलं करतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 06:37 PM IST

दारू- सिगरेटपासून तुम्ही मुलांना असं ठेवू शकता दूर

असं म्हटलं जातं की, मुलं आपल्या वडिलधाऱ्यांकडे पाहून शिकत असतात. घरात मद्यपान करणारं कोणी असेल तर  त्याचं अनुसरण मुलं करतात. आता तर मुलं 10 वी 11 वीतच बिअर आणि सिगरेट ओढताना दिसतात. काही मुलं तर त्याहून कमी वयात गुटखा खायला आणि सिगरेट ओढायला सुरुवात करतात. कमी वयातच दारू प्यायला सुरुवात केल्यामुळे या व्यसनांच्या ते आहारी जातात. विशेष म्हणजे आई- वडिलांना मुलांच्या या व्यसनाबद्दल माहीतही नसतं.

मुलांच्या या सवयीबद्दल जेव्हा त्यांना कळते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. अशावेळी पालकांना आपल्या मुलाशी गप्पा मारत राहिल्या पाहिजेत. पुढील टीप्सच्या मदतीने तुम्ही स्वतः मुलांना या नशेपासून सहज दूर ठेवू शकता.

मूल लहान असताना ते आई- वडिलांच्या फार जवळ असतं. ते शाळेत घडलेल्या गोष्टींपासून ते खेळण्यातील भांडणापर्यंतच्या प्रत्येक गोष्टी आई- वडिलांना सांगतात. पण जस जसं वय वाढत जातं ते अनेक गोष्टी लपवायला लागतात. ते आपल्या आई- वडिलांपासून भावनिकरित्या दूर होऊ लागतात. अशी स्थिती तुमच्या आणि तुमच्या मुलांमध्ये येऊ देऊ नका. नेहमीच त्यांचे बेस्ट फ्रेंड होऊन अनेक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा.

घरातील महत्त्वपूर्ण निर्णयांमध्येही मुलांचं मत घ्या. यावरून त्यांनाही वाटेल की त्यांच्यापासून आई- वडील काहीच लपवत नाहीत. त्यांना लहानपणापासूनच मादक पदार्थ काय असतात ते सांगा. तसेच ते का खाऊ- पिऊ नयेत तेही सांगा. अनेक पालक त्यांच्या मुलांशी याबद्दल जाणीवपूर्वक बोलत नाहीत.

जर तुम्हाला दारू पिण्याची आणि सिगरेट ओढण्याची सवय असेल तर मुलांना हे सतत सांगा की ही वाईट सवय असून तुम्ही ही सवय सोडण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची मुलंही ही सवय सोडण्याचा तुमची मदत करतील. आपल्या मुलांच्या मित्र- मैत्रिणींबद्दल माहिती ठेवा. ते कोणाला भेटतात आणि काय करतात या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. या सोबतच मुलांची पॉकेटमनीही कमी ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवा.

Loading...

एकटे राहणारे असतात इंटेलिजेंट! संशोधनात झालं सिद्ध

मान दुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार

Research: पती सोबत असेल तर कमी होतं Labour Pain

Ex ला सोशल मीडियावर स्टॉक करणं सामान्य गोष्ट आहे?

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...