Home /News /lifestyle /

उन्हाळ्याच्या दिवसातही ओठ राहतील गुलाबी आणि चमकदार; घरच्या-घरी करा असे सोपे उपाय

उन्हाळ्याच्या दिवसातही ओठ राहतील गुलाबी आणि चमकदार; घरच्या-घरी करा असे सोपे उपाय

उन्हाळ्यात फुटलेले ओठ बरे करण्यासाठी केवळ लिप बाम उपयोगी नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही बरेच बदल करावे लागतील. जाणून घेऊया उन्हाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी.

    मुंबई, 15 मे : ओठांची त्वचा शरीरावर इतरत्र असलेल्या त्वचेपेक्षा अधिक नाजूक आणि मऊ असते. त्यासाठी सर्व ऋतुमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. पण जर आपण उन्हाळ्याच्या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास ओठांची काळजी अधिक घ्यावी लागेल. कडक सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांमुळे ओठ कोरडे आणि तडकायला लागतात. इतकेच नाही तर या ऋतूमध्ये जास्त घाम आल्याने शरीरात पाण्याची कमतरता सहज होऊ शकते, त्यामुळे ओठ कोरडे होऊन त्यांना भेगा (Summer Lips Care) पडू शकतात. उन्हाळ्यात फुटलेले ओठ बरे करण्यासाठी केवळ लिप बाम उपयोगी नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही बरेच बदल करावे लागतील. जाणून घेऊया उन्हाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी. उन्हाळ्यात ओठांची अशी घ्या काळजी - सन प्रोटेक्टर वापरा - जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात बाहेर जाल तेव्हा एसपीएफ असलेले लिप बाम वापरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अशी लिपस्टिकही खरेदी करू शकता. ओठांना उन्हाच्या त्रासापासून आणि ओठ काळे पडण्यापासून बचाव होऊ शकतो. ओठ हायड्रेटेड ठेवा - जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर त्यांना पोषण आणि हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अधिकाधिक पाणी प्या. याशिवाय तुम्ही नारळपाणी, लिंबूपाणी वगैरेही पिऊ शकता. हे वाचा - जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या ओठांना एक्सफोलिएट- आठवड्यातून एकदा स्क्रबने ओठ एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास अधिक फायदा होईल. मालिश - तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे दही किंवा मलईने ओठांना मसाज करू शकता. तुम्हाला हवे असल्यास बदामाच्या तेलानेही मसाज करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि ओठ छान गुलाबी राहतील. हे वाचा - केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय या नैसर्गिक गोष्टींनी ओठांची काळजी घ्या - ग्लिसरीन आणि मधाची पेस्ट बनवून झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. सकाळपर्यंत ओठ मऊ होतील. एक चमचा साखरेमध्ये एक चमचा मध मिसळून हलक्या बोटांनी ओठांवर चोळा. मृत पेशी निघून जातात. दिवसातून 2-3 वेळा ओठांवर शुद्ध खोबरेल तेल लावा, त्यामुळे ओठ मऊ राहतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle

    पुढील बातम्या