News18 Lokmat

अशी घ्या हिवाळ्यात हातांची काळजी

हात कणखर होतात आणि खडबडीतही होतात. तुमच्या हाताला थंडीमध्येही जर मऊ ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी काही खास उपाय

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2017 12:39 PM IST

अशी घ्या हिवाळ्यात हातांची काळजी

26 ऑक्टोबर: ऑक्टोबरचा महिना आलाय अर्थात हिवाळ्याला सुरवात झाली आहे. थंडीची कुणकुण जाणवायला लागली की आपल्या शरीरासोबतच आपल्या हातांची काळजी घेणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपले हात नेहमी उघडे असतात त्यामुळे थंडीने हातातील मऊपणा नाहीसा होतो. हात कणखर होतात आणि   खडबडीतही होतात. तुमच्या हाताला थंडीमध्येही जर मऊ ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी काही खास उपाय

- थंडीत रात्री झोपताना हातांना नारळाचे तेल लावून झोपा. यामुळे सकाळी उठल्यावर तुमचे हात मुलायम  आणि खूप चमकदार होतील.

- मॉश्चराइजर आणि साबणामुळे आपले हात कोरडे पडतात. त्यामुळे कोणताही साबण विकत घेताना ऑलिव्ह ऑइल किंवा टी ऑइल असलेले साबणच विकत घ्या.

- व्हिनेगरच्या वापराने देखील हातातील खडबडीतपणा निघून जातो. व्हिनेगर लावल्यानंतर गरम पाण्यात हात भिजवा आणि ब्रशने हात घासा. यामुळे तुमचे हात खूप मुलायम होतील.

- जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर त्यानेही तुमचे हात खरखरीत होणार नाहीत. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असलं की त्वचा नरम आणि मृदु राहते.

Loading...

- खडबडीत झालेल्या हातांना लवकर मऊ आणि सुंदर बनवायचे असेल तर नियमित मॉश्चराइजर लावा. मॉश्चराइजर लावल्याने हाताची सुकलेली त्वचा चांगली होते. पण लक्ष असूद्या की तुम्ही वापराल ते मॉश्चराइजर नैसर्गिक असेल आणि केमिकलरहित असेल.

- हातांवर केमिकल असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. बटर, कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल असलेले प्रॉडक्ट वापरावे. शक्य असेल तर नैसर्गिकरित्या बनवलेले हँन्ड लोशन वापरावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...