'अशी' घ्या तुमच्या मौल्यवान दागिन्यांची काळजी

'अशी' घ्या तुमच्या मौल्यवान दागिन्यांची काळजी

फक्त नविन दागिने विकत घेणंच नाही तर त्यांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. दागिन्यांची नीट काळजी नाही घेतली तर त्यांची चमक कमी होते आणि ते वापरण्या योग्य राहत नाहीत. तुमच्या आवडत्या आणि मौल्यवान दागिन्यांची काळजी घेण्यासाठी खालील काही खास उपाय.

  • Share this:

8 डिसेंबर : महिलांची आवडीची गोष्ट म्हणजे दागिने. पण फक्त नविन दागिने विकत घेणंच नाही तर त्यांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे.

दागिन्यांची नीट काळजी नाही घेतली तर त्यांची चमक कमी होते आणि ते वापरण्या योग्य राहत नाहीत. तुमच्या आवडत्या आणि मौल्यवान दागिन्यांची काळजी घेण्यासाठी खालील काही खास उपाय.

- दागिन्यांवर कधीही धूळ बसू देऊ नका. दागिन्यांना स्वच्छ पद्धतीने परिधान करा आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ डब्यातच ठेवा.

- ओल्या अंगावर कोणत्याही प्रकारचे दागिने परिधान करू नका. याने तुमचे मौल्यवान दागिने खराब होऊ शकतात.

- दागिने परिधान करण्याआधी किंवा नंतर शरीरावर कोणत्याही प्रकारचा डिओ, परफ्युम वापरू नका. त्याने दागिन्यांची चमक कमी होते.

- क्लासिक दागिने आणि फॅन्सी दागिने नेहमी वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवा. असं केल्याने दागिने खराब होणार नाही आणि त्यांची चमकही कमी होणार नाही.

- वर्षातून एकदा तरी आपले सगळे दागिने उन्हात ठेवा आणि नंतर स्वच्छ करूनच ते परत डब्यात ठेवा.

- सध्या दागिन्यांचे अनेक प्रकार आले आहेत. त्यामुळे सगळे दागिने वेगवेगळे ठेवा, त्याने दागिन्यांची गुंतागुंत होणार नाही आणि तुटणारही नाही.

- दागिन्यांना परिधान केल्यानंतर कोणतंही क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नका. त्याने दागिन्यांचा रंग जातो.

- प्रत्येक दागिन्यांची काळजी घेण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे दागिने विकत घेताना दागिन्यांच्या दुकानात त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत विचारा.

First published: December 8, 2017, 6:27 PM IST

ताज्या बातम्या