पावसाळ्यात कशी घ्याल कुरळ्या केसांची काळजी?

पावसाळ्यात कशी घ्याल कुरळ्या केसांची काळजी?

पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी जरा जास्तच घ्यावी लागते. परंतु कुरळ्या केसांची काळजी घेणे हे थोडे कठीणच असते.

  • Share this:

09 जुलै : पावसाळ्यात  आपल्या केसांची काळजी जरा जास्तच घ्यावी लागते. परंतु कुरळ्या केसांची काळजी घेणे हे थोडे कठीणच असते. तर बघुया कोणत्या या घरगुती उपायांमुळे अशा केसांची कशी काळजी घेतली जाईल.

1) खूप पाणी प्या

पाणी पिणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. दिवसभरात 8 ग्लास नियमतपणे पाणी प्यायल्याने शरीरात  पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच  केस मुलायम आणि चमकदार बनण्यास मदत होते.

2) शरीरात तरल पदार्थांची कमतरता भासू देऊ नका

पाण्याबरोबरच ताक, दही, लिंबू पाणी, थंड कॉफी किंवा थंड चहा प्यावा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होत असल्याने केसांना सुद्धा थंडावा मिळतो.

3) रोज शॅम्पूचा वापर करणे टाळा

कुरळ्या केसांबरोबरच घामाचीपण समस्या निर्माण होते.  परंतु नियमितपणाच्या शॅम्पूच्या वापरामुळे केस कमकुवत होऊ शकतात. म्हणून कधी कधी केस थंड पाण्याने किंवा कंडिशनरचा उपयोग करून धुवावेत.

4) तिळाचे तेल गुणकारी

आंघोळीच्या अर्ध्या तास अगोदर तिळाच्या तेलाने केसांच्या मुळांना मसाज केल्यास केसांना थंडावा मिळतो. तसेच त्यानंतर  शॅम्पूने केस धुतल्यास कोणतीही हानी होत नाही आणि घामसुद्धा येत नाही.

5) केसांना नेहमी बांधून ठेवू नये

केसांना नियमितपणे बांधून ठेवल्याने केसांत घाम येतो तो केसांकरता अपायकारक ठरु शकतो. शक्यतो केसांना मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करुन

धूळ आणि उन्हामध्ये केसांची काळजी जरा जास्तच घ्यावी.

First published: July 9, 2017, 7:57 PM IST

ताज्या बातम्या