छोट्यांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

छोट्यांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

अभ्यास करताना, टीव्ही पाहताना जर तुमच्या लहानग्याचं डोकं दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांकडून त्याची तपासणी करुन घ्या.

  • Share this:

16 सप्टेंबर : पूर्वी वय वाढलं की चष्मा लागायचा, पण आता लहान मुलांनाही डोळ्यांचा त्रास होऊ लागला आहे. डोळ्यांच्या त्रासाला आताची बदलती लाईफस्टाईलच कारणीभूत आहे.

लहान मुलांचं डोकं दुखण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. अभ्यास करताना, टीव्ही पाहताना जर तुमच्या लहानग्याचं डोकं दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांकडून त्याची तपासणी करुन घ्या. डोळ्यांना त्रास होऊन दृष्टीहीन होण्याचं हे पहिलं कारण आहे.

शक्यतो, झोप आल्यावर किंवा डोळ्यात कचरा गेल्यावर आपण डोळे चोळतो,  पण तुमचं बाळ जर सारखं डोळे चोळत असेल तर हे आंधळेपण येण्याचं मुख्य कारण आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.

जर उजेडापासून मुलांना त्रास होत असेल तर आधीच त्यावर योग्य ते उपचार करा. खरं तर शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असली की असे आजार होण्याची आणि डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य तो आहार करणे आवश्यक आहे, नाहीतर चष्मा लागण्याची शक्यता आहे.

जर वारंवार आपण आपली मान गोल फिरवत असू तर त्यानेही आपल्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. जर तुमचा लहानगा टीव्ही पाहताना सारखे डोळे बंद करत असेल तर लागलीच त्याच्या डोळ्यांची तपासणी करुन घ्या.

जर लहान मुलं कोणती वस्तू, पुस्तक किंवा टीव्ही खूप जवळून पाहत असतील तर त्यांना नक्कीच डोळ्यांचा त्रास असू शकतो, आणि त्याने हळूहळू दृष्टीहीन होण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्यांना ओरडण्यापेक्षा नेत्रतज्ज्ञांकडून त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून घ्या.

First published: September 16, 2017, 4:22 PM IST

ताज्या बातम्या