मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना लॉकडाऊनमध्ये एकट्या राहणाऱ्या हार्ट पेशंटने कशी घ्यावी स्वत:ची काळजी?

कोरोना लॉकडाऊनमध्ये एकट्या राहणाऱ्या हार्ट पेशंटने कशी घ्यावी स्वत:ची काळजी?

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 01 नोव्हेंबर : भारतात कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. इतर आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक आहे, त्यामुळे या रुग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो घराबाहेर पडू नका आणि तुम्ही घरात एकटेच राहत असाल तर आपली पूरेपूर काळजी घ्या. कोरोना लॉकडाऊनदरम्यान तुम्ही घरात एकटे असाल आणि हार्ट पेशंट (heart patient) असाल तर काय आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती तुम्हाला हवी.

चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि कौटुंबिक इतिहास ही हार्ट अटॅकची कारणं असू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं तुम्हाला माहिती असायला हवीत. छातीत दुखणं, मळमळ होणं, उलट्या होणं, थकवा जाणवणं आणि हलकीशी डोकेदुखी यांचा यात समावेश आहे. व्यक्तींनुसार ही लक्षणंही बदलू शकतात, असं मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांनी सांगितलं.

जर आपल्याला किंवा आपल्या जवळील एखाद्या व्यक्तीस तीव्र हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा भविष्यात अशा समस्यांचा सामना करावा लागू नये असे वाटत असल्यास खाली दिलेल्या या सूचनांचं पालन करा आणि निरोगी रहा

1) जर एखाद्यास तीव्र हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्वरित उपचार घेण्यासाठी रूग्णवाहिकेतून त्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा. त्या व्यक्तीस चालू देऊ नका. लगेच घेता येतील अशा औषधांची माहिती डॉक्टरांकडून घ्या.

2) हार्ट अटॅकवर मात केली तर मात्र दररोज व्यायाम करून शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. आपण घरच्या घरी चालू शकता, एरोबिक्स आणि योगा यांसारख्या पर्यायांची निवड करू शकता. मेडिटेशन करून तणावमुक्त राहू शकता.

3) आपल्याकडे आपल्याकडे औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही याची खात्री करून घ्या.

4) गरज नसल्यास बाहेर न पडता टेलीमेडिसिन किंवा व्हिडिओ कॉलमार्फत सल्ला घेण्याचा पर्याय निवडा.

5) आजारी माणसांच्या आसपास राहणं टाळा नाहीतर अधिक समस्या उद्भवू शकतात.

हे वाचा - कसं शक्य आहे? संपूर्ण देशात 6 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही

6) सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करा. आपलं तोंड मास्कचा वापर करून झाकून घ्या.

7) वेळोवेळी आपले हात स्वच्छ करा. डोअरनॉब्ज, डोअर हँडल्स, स्विच इत्यादीमधून संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे याला हात लावल्यानंतर हात नक्की धुवा.

8) जंकफूड, तेलकट, प्रक्रिया केलेल्या आणि खारट पदार्थांचे सेवन टाळा. मेदयुक्त पदार्थ, कार्बोहायड्रेट आणि कृत्रिम चव असलेले पदार्थ खाऊ नका.

9) आहारामध्ये कमीतकमी तेलाचा वापर करा.

10) संतुलित आहार घ्या.  ताजी फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करायला विसरू नका.

हे वाचा - टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

12) आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी शारीरीक तपासणी करून घ्या. वेळोवेळी आपला रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीची पाहणी करा. याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.

13) पुरेशी झोप घ्या आणि शरीराला विश्रांती घ्या.

14) दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात रहा. आपल्या प्रियजनांशी मनमोकळ्या गप्पा मारा आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

15) आपल्याला पेंटिंग किंवा बागकाम आवडत असल्यास नक्कीच आपला वेळ यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करा.

First published:

Tags: Health, Tips for heart attack