या 10 गोष्टी करून शरीराचा मेटॅबाॅलिझम ठेवू शकाल मजबूत

या 10 गोष्टी करून शरीराचा मेटॅबाॅलिझम ठेवू शकाल मजबूत

मेटॅबाॅलिझम म्हणजे चयापचय क्रिया. आपलं शरीर फॅट किती प्रमाणात बर्न करतं, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : अनेक लोक वजन कमी करण्यासाठी खूप धडपडत असतात. पण त्याऐवजी आपला मेटॅबाॅलिझम मजबूत करा. मेटॅबाॅलिझम म्हणजे चयापचय क्रिया. आपलं शरीर फॅट किती प्रमाणात बर्न करतं, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

स्त्रीच्या तुलनेत पुरुष जास्त लवकर कॅलरीज बर्न करतात. काही लोकांमध्ये 40च्या नंतर मेटॅबाॅलिझम कमकुवत होतो. मग तो मजबूत कसा बनवायचा? जाणून घेऊ काही टिप्स.

एरोबिक्स हा महत्त्वाचा व्यायाम आहे. त्यानं तुमचे स्नायू मजबूत राहतात. एरोबिक्स मेटॅबाॅलिझम मजबूत करतं. डिहायड्रेशनमुळेही शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. म्हणून रोज आठ ते नऊ ग्लास पाणी प्या. शिवाय दिवसातून थोडं थोडं पाच वेळा खा. त्यानंही मेटॅबाॅलिझम सुधारतो.

रणरणत्या उन्हात दही खाल्ल्यानं होतात 'हे' फायदे

लग्नाआधी 'या' वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं

शिवाय तुम्ही एनर्जी ड्रिंक आणि कॅफिन यांचं सेवन करू नका. यामुळे तुमचा मेटॅबाॅलिझम कमकुवत होतो. याशिवाय तुम्हाला रक्तदाब, भीती वाटणं, झोप न येणं या समस्या होऊ शकतात.  तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हेल्थी फुड ठेवलंत तर वजन कमी होईल. प्रत्येक जेवणात 3 ते 4 तासाचं अंतर ठेवा. पचायला कठीण असलेले पदार्थ टाळा.

असं म्हणतात की तिखट जेवण जेवलात तर मेटॅबाॅलिझम मजबूत होतो. म्हणूनच जेवणात लाल मिरची, हिरवी मिरची असू द्या. जेवणात मासे, नट्स, बिन्स, अंडं आणि कमी फॅट्सचे डेअरीचे पदार्थ हवेत. कारण शरीराला कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त प्रोटिन्सची गरज असते.

रोज एक कप ग्रीन टी प्या. यामुळे मेटॅबाॅलिझम व्यवस्थित राहतं. शिवाय ब्लॅक काॅफी प्यायली तरीही फायदेशीर आहे.

First published: March 23, 2019, 5:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading