Home /News /lifestyle /

Tips to Store Potatoes : बटाटा जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या पद्धती

Tips to Store Potatoes : बटाटा जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या पद्धती

बटाटा हा असा पदार्थ आहे जो सर्वानाचा खायला फार आवडतो. आपल्या दैनंदिन आहारात आपण सतत जेवनात आपण बटाट्याची भाजी करतो किंवा त्याची चटणीही करतो. परंतु जेव्हा बटाटा शेतातून काढल्यानंतर त्याला टिकवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : बटाटा हा असा पदार्थ आहे जो सर्वानाचा खायला फार आवडतो. आपल्या दैनंदिन आहारात आपण सतत जेवनात आपण बटाट्याची भाजी करतो किंवा त्याची चटणीही करतो. परंतु जेव्हा बटाटा शेतातून काढल्यानंतर त्याला टिकवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. जेव्हा बाजारात बटाट्याचे भाव वाढतात तेव्हा आपल्याला त्याला जास्त प्रमाणात खरेदी करून साठवणूक (How to Store Potatoes) करून ठेवावी लागते. कारण हंगामानुसार (potatoes after harvest store) आपल्या बटाट्याला आहारात घेता येते. त्याचबरोबर त्याचे चिप्सही पावसाळ्यात (potatoes for winter) बनवून खाणे लोकांना फार आवडते. परंतु जेव्हा आपण बटाट्याटी साठवणूक  (Potatoes For Long Time store) करायला सुरूवात करतो तेव्हा त्याला अंकूर येतात. आणि त्यानंतर ते खाण्यायोग्य राहत नाही. आपण काही गोष्टींनी काळजी घेतली तर त्याला आपण जास्त दिवस साठवून ठेऊ शकतो. त्यामुळे आता कोणत्या पद्धतीने आपण बटाट्याला चांगल्या प्रकारे साठवू शकतो याबाबत आपण काही माहिती घेऊयात. केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं? अनेक कुटुंबांमध्ये बटाटा आणि कांदा एकसोबत खाल्ले जाते. त्यावेळी या दोन्ही पदार्थांनाही सोबतच ठेवले जाते. ही पद्धत चुकीची आहे कारण कांदा आणि बटाट्याला वेगवेगळं ठेवायला हवं. त्यामुळे ते जास्त दिवस टिकतात. त्याचबरोबर आपण अनेकदा बटाटे आणल्यानंतर उघड्या जागेवर अथवा गच्चीत, गॅलरीत, अंगणात वाळवण्यासाठी ठेवायला हवेत. Relationship Promises : प्रेमळ नात्यासाठी आपल्या पार्टनरची अशी घ्या काळजी चांगल्या प्रतीचे बटाटे असतील आणि अशा पद्धतीने हवेत वाळवले आणि स्वच्छ जाही ठेवले तर ते बरेच दिवस टिकतात. जुना बटाटा चांगला असं म्हणतात. फक्त तो व्यवस्थित साठवलेला असावा. बटाटा टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट  त्याला मिळणारी हवा असते. जर त्याला हवा मिळाली नाही तर बटाटे सडण्याची शक्यता असते.  
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Food, Health, Tasty food

    पुढील बातम्या