या सोप्या टिप्सने तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता

या सोप्या टिप्सने तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता

ब्रेस्ट कॅन्सर हा डक्टमध्ये छोट्या कॅल्शिफिकेशनच्या जमा होण्याने किंवा स्तनांच्या टिश्यूमध्ये छोट्या गाठी झाल्याने होतो.

  • Share this:

भारतात स्तनांच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. यातही शहरी महिलांना स्तनांचा कर्करोग होत असल्याच्या घटना जास्त आहे. स्तन हे शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. ब्रेस्ट टिश्यूमुळे दूध तयार होतं. हे टिश्यू टक्टच्या मार्फत निपलला जोडले जातात. ब्रेस्ट कॅन्सर हा डक्टमध्ये छोट्या कॅल्शिफिकेशनच्या जमा होण्याने किंवा स्तनांच्या टिश्यूमध्ये छोट्या गाठी झाल्याने होतो. काही वेळाने याचं कर्करोगात रुपांतर होऊ लागतं. कालांतराने याचा संसर्द लिंफोटिक चॅनल किंवा रक्त प्रवाहामार्फत शरीरातील अन्य भागांमध्ये होऊ शकतो. स्तनाला गाठ येणं, स्तन सूजणं आणि स्तनाच्या त्वचेत बदल होणं अशी काही स्तनाच्या कर्करोगाची  लक्षणं असतात.

काही गोष्टी डाएटपासून करा दूर-

अधिक वय, कौटुंबिक इतिहास, मासिक पाळीत त्रास, शारीरिक क्रिया न करणं, मुल न होणं, लठ्ठपणा यांसारख्या गोष्टींमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक वाढतो. जर महिलांना वरील स्थितीपासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर डाएटमधून काही गोष्टी दूर करणं गरजेचं आहे. मात्र असं केल्याने स्तनाचा कर्करोग होणारच नाही हेही काही गरजेचं नाही. पण यामुळे धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या खाल्ल्या नाही तर कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

नियमित स्वरुपात दारू पिणं-

सतत मद्यपान केल्याने स्तनाच्या कर्करोग होण्याचा धोका वाढतो. अल्कोहोलच्या सेवन हे एस्ट्रोजेनचा स्तर वाढवतं आणि डीएनए पेशींना नुकसान करते. याचमुळे महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींने वाढतो.

जास्त गोड खाणं-

एका संशोधनानुसार साखर ही मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट ट्यूमरच्या विकासाला मदत करते. सॉस, स्पोर्ट्स ड्रिंक, टॉकलेट मिल्क अशा पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. त्यामुळे हे पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

खाण्यातले फॅट-

प्रोसेस्ड फूडमध्ये मिळणारं फॅट हे ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यास मदत करते. बर्गर, फ्रेंच फ्राइज, चाट अशा पदार्थांमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

जेवणात सतत मटण खाणं-

फॅट, मीठ आणि प्रिझर्वेटिव्हयुक्त मटणामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. ज्या महिला रेड मीट मोठ्या प्रमाणात खातात, त्यांच्यात हा आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

...म्हणून मुलं त्यांच्याहून जास्त वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतात

वेळीच व्हा सावध, या आजाराची लक्षणं कळत नाहीत आणि अचानक होतो मृत्यू

Iron च्या कमतरतेमुळे होऊ शकता हा आजार, दुर्लक्ष केलं तर जाऊ शकतो जीव!

नियमितपणे करताय व्यायाम तर चुकूनही करू नका डाएटिंग, शरीराचं होईल मोठं नुकसान

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 10:26 PM IST

ताज्या बातम्या