सकाळच्या 'या' 5 सवयी तुम्हाला लवकर करू शकतील वृद्ध

सकाळच्या 'या' 5 सवयी तुम्हाला लवकर करू शकतील वृद्ध

सकाळच्या या काही सवयी तुम्ही वेळीच सोडल्या नाहीत तर, तुमचं तारुण्य लवकर सरणार हे नक्की!

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : आपल्या सर्वांची नेहमीच तरुण दिसण्याची आणि राहण्याची इच्छा असते. पण, माणसाचं निर्सगापुढे काही चालत नाही. त्यामुळे वाढत्या वयासोबत बदल होतात आणि तारुण्य कमी होतं. 'अजुनी यौवनात मी'  असं म्हणावसं वाटतं, पण कधी कधी होतं उलटं. तुम्ही वयापेक्षा मोठे दिसायला लागता. मग धडपड चालू होते ती जीमला जायची, पांढऱ्या केसांना काळं करायची. पण, ही प्रोसेस सुरू झाली की या उपायांचा फायदा फारसा होत नाही.

काही चांगल्या-वाईट सवयीदेखील तुम्हाला लवकर म्हातारे करू शकतात. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. जर तुम्हाला लवकर वृद्ध व्हायचं नसेल तर जाणून घ्या कोणत्या सवयी तुमचं म्हातारपण जवळ आणतील. सकाळी उठल्यानंतरच्या काही सवयी तुम्ही वेळीच सोडल्या नाही तर, तुमचं तारुण्य कमी होऊ शकतं.

अकाली वृद्धत्व येतं ते अशा वाईट सवयींमुळे. या सवयी आपल्या बदलत्या लाईफस्टाईलचा भाग असल्या, तरी त्या वेळीच बदलल्या नाहीत तर त्यातून पुढे त्रास होऊ शकतो. अनेक लाईफस्टाईल डिसीझेस लवकर येऊ शकतात.

(हे वाचा - ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं साक्षीला पडलं महाग, चक्क 80 हजारांचा गंडा!)

गरम पाण्याने स्नान करणे

अनेकांना सकाळी उठल्यावर लगेचच कडक गरम पाण्याने अंघोळ करायची सवय असते. मात्र त्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या अधिक दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे सकाळी गरम पाण्याने अंघोळ करु नये किंवा पाणी कोमट घ्यावे.

सकाळचा नाश्ता न करणे

प्रत्येक घरात सकाळचं चित्र हे काहीस गोंधळाचं दिसून येतं. शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जायची गडबड असते. त्यातच अनेक जण सकाळचा नाश्ता  स्किप करतात.  वेळ नाही, जमत नाही ही कारणं देऊन नाश्ता न करणं पुढे त्रासदायक ठरू शकतं. खरंतर सकाळचा नाश्ता हा न चुकता, परिपूर्ण आणि वेळेवर केला पाहिजे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतोच त्यासोबत तुम्ही लवकर म्हातारे दिसू लागता. नाश्ता न केल्याने तुम्ही बराच वेळ भुकेले राहता. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिऴत नाही आणि शरीर लवकर थकतं. एवढचं नाही तर, त्यामुळे तुम्हाला इतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

उशिरा झोपणे

लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयुष्य आरोग्य लाभे ! ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. ते अगदी खरं आहे. उशीरा उठल्याने सर्व कामं अर्धवट राहतात. त्यामुळे तुमच्यावरचा तणाव अधिक वाढतो. तणावाचा परिणाम शरीरावर होतो आणि त्यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे तरुणवयापासूनच आजारांची रांग लागते.

(हेही वाचा पिवळ्या साडीवाल्या 'त्या' महिला ऑफिसरचा Tik Tok Video व्हायरल)

धूम्रपान

ध्रूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहेच. त्याचं व्यसन असणाऱ्या लोकांना ते कधीही करायची इच्छा होते. पण, सकाळी दिवसाची सुरुवात सिगरेटने करणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं.

(ऑफिसमध्ये सतत झोप येते? चहा-कॉफीचा कप उचलण्याआधी हे वाचा...)

धूम्रपानामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतीत. त्यामुळे तुम्ही वृद्ध दिसू लागता.

पाणी न पिणे

दिवसभरातून तुम्ही किती पाणी पिता हे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जास्त पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी आवर्जून पिणे गरजेचे आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 28, 2019, 6:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading