Home /News /lifestyle /

Sleep For Beautiful Skin: सुंदर दिसण्यासाठी जास्त काही करू नका, फक्त झोपा; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Sleep For Beautiful Skin: सुंदर दिसण्यासाठी जास्त काही करू नका, फक्त झोपा; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Sleep Well For Beautiful Skin: त्वचा निरोगी राहिली तर ती सुंदर दिसते. मग रंग सावळा आहे की गोरा याने फारसा फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला सौंदर्य टिकवायचे असेल, तर दररोज पूर्ण आणि चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

    मुंबई, 09 जानेवारी : चांगली झोप (Sleep) आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे केवळ आपले शरीर आणि मन निरोगी राहत नाही तर आपल्या त्वचेची चमक आणि सौंदर्य देखील चांगले राहते. त्वचा निरोगी राहिली तर ती सुंदर दिसते. मग रंग सावळा आहे की गोरा याने फारसा फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला सौंदर्य टिकवायचे असेल, तर दररोज पूर्ण आणि चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक (Sleep Well For Beautiful Skin) आहे. एवढेच नाही तर दररोज चांगली झोप न मिळाल्यास तुमच्या क्रिएटिव्हिटीवरही परिणाम होतो. कारण यामुळे तुमचे मन चंचल राहते. याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी झोपही आवश्यक आहे. जाणून घेऊया अशा (Sleep Health Benefit) गोष्टींबद्दल ज्या चांगल्या झोपेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉप नको आजच्या तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीत ही समस्या खूप सामान्य झाली आहे. आपण अनेकदा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही इत्यादींना चिकटून बसतो आणि झोपेच्या वेळीही ती चालू असतात. चांगल्या झोपेसाठी झोपेच्या किमान अर्धा तास आधी या सर्व उपकरणांपासून दूर होणे आवश्यक आहे. मोबाईल, लॅपटॉप इत्यादी स्क्रीनचा प्रकाश आपल्या झोपेला त्रास देतो असे अनेक संशोधनातून दिसून आलं आहे. म्हणूनच झोपण्यापूर्वी तुमच्या हृदयाला आणि मनाला शांती देण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाशात दररोज थोडा वेळ घालवा सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन्स तयार होतात, जे चांगल्या झोपेसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे शक्य असल्यास काही वेळ उन्हात राहावे. तसेच घराचे दरवाजे आणि खिडक्या काही काळ उघड्या ठेवा, जेणेकरून ताजी हवा येईल आणि तुम्ही आनंदी राहाल. ही गोष्ट तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. हे वाचा - एखाद्या Omicron Positive च्या संपर्कात आलाच तर या 4 गोष्टी न विसरता करा रात्री उशिरा खाणे टाळा रात्री उशिरा खाणे टाळाच, कारण असे केल्याने तुमच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन्सची निर्मिती कमी होते. जी चांगल्या झोपेसाठी खूप महत्वाची आहे. इतकेच नाही तर रात्री उशिरा जेवल्याने पोटात गॅस आणि अपचन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्या झोपेत अडथळा बनतात. त्यामुळे जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर रात्री उशिरा काहीही खाणे किंवा पिणे टाळा. हे वाचा - Weight Gain Protein Shake: वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 5 प्रोटीन शेक; दुबळेपणा होईल गायब रहाल तंदुरुस्त हेड मसाज झोपण्यापूर्वी स्वत:ला पूर्णपणे शांत करण्यासाठी डोक्याचा मसाज खूप प्रभावी आहे. यामुळे तुमचे मन शांत होते आणि थकवा दूर होतो. मानसिक शांतीसाठी झोपताना उशीभोवती काही चांगले परफ्यूम देखील वापरू शकता. या सवयींचा अवलंब केल्यास शांत झोप लागते. यामुळे तुमच्या मन आणि शरीरासोबतच त्वचाही टवटवीत राहते. तसेच, चांगली झोप घेतल्याने तुमचे आरोग्य आणि सौंदर्य सुरक्षित राहते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या