मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरबसल्या खुलवा चेहऱ्याचं सौंदर्य; ‘या’ उपायांनी सहज घालवा चेहऱ्यावरील नको असलेले केस

घरबसल्या खुलवा चेहऱ्याचं सौंदर्य; ‘या’ उपायांनी सहज घालवा चेहऱ्यावरील नको असलेले केस

चेहऱ्यावर असणाऱ्या अनावश्यक केसांमुळे महिलांचं सौंदर्य झाकोळतं. त्यामुळे महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतात; पण अनेकदा त्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठीही वेळ मिळत नाही

चेहऱ्यावर असणाऱ्या अनावश्यक केसांमुळे महिलांचं सौंदर्य झाकोळतं. त्यामुळे महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतात; पण अनेकदा त्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठीही वेळ मिळत नाही

चेहऱ्यावर असणाऱ्या अनावश्यक केसांमुळे महिलांचं सौंदर्य झाकोळतं. त्यामुळे महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतात; पण अनेकदा त्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठीही वेळ मिळत नाही

मुंबई 08 ऑगस्ट : चेहरा हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो, असं नेहमी म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहूनच अनेकदा त्याच्या जीवनशैलीची माहिती होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्याची योग्य निगा राखली जाणं अत्यंत आवश्यक आहे. चेहऱ्यावर असणाऱ्या अनावश्यक केसांमुळे महिलांचं सौंदर्य झाकोळतं. त्यामुळे महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतात; पण अनेकदा त्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठीही वेळ मिळत नाही. अशा स्थितीत काही सोपे घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील अनावश्यक केस त्यांना काढता येऊ शकतात. ‘ओन्ली माय हेल्थ हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. ओट्स आणि केळी चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या घरगुती उपायांमध्ये केळी आणि ओट्सचा फायदा होऊ शकतो. ओट्सची पूड आणि केळाचं मिश्रण तयार करावं. चेहऱ्यावर ते लावावं आणि 15 मिनिटं तसंच राहू द्यावं. त्यानंतर ओल्या हातानी चेहऱ्यावर मसाज करावा. या पेस्टमुळे चेहऱ्यावर एक प्रकारचा मुलायमपणाही येतो. पपई आणि हळद चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी पपई व हळदीचा चांगला उपयोग होतो. सर्वांत आधी पपईची पेस्ट तयार करावी. यात 2 ते 3 चिमूटभर हळद टाकावी. 5 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवावं. चेहरा स्वच्छ केल्यानंतर तयार केलेली ही पेस्ट चेहरा व मानेच्या भोवती लावावी. पेस्ट वाळल्यानंतर ओल्या हातांनी ती पेस्ट काढून टाकावी. हळदीमुळे त्वचा उजळून निघण्यासही मदत होईल. Beauty Tips For Women In 50's : वयाच्या पन्नाशीतही दिसायचंय चिरतरुण? फॉलो करा ब्युटी टिप्स साखर, लिंबू आणि मधाचं मिश्रण चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी साखर, लिंबू आणि मधाचं मिश्रण अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. यासाठी 1 चमचा साखर, 1 चमचा मध, लिंबाच्या रसात टाका आणि पाणी टाकून त्याला चांगलं मिसळून घ्या. त्याची चाचणी होईल तोपर्यंत त्याला तापवावं. हे मिश्रण थंड झालं की व्हॅक्सिंग स्ट्रिप किंवा एक सुती कापडाच्या मदतीने केस आहेत तेथे उलट्या दिशेने ते मिश्रण लावावं. हा प्रकार केल्याने त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे मॉश्चरायझरचा उपयोगही करता येईल. घरगुती उपाय केल्यानंतर चेहऱ्यावरील केसांची वाढ आपोआप कमी होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दरवेळी केमिकलयुक्त गोष्टींचा वापरही टाळता येतं. सातुचं पीठ आणि दुधाची पेस्ट सातुचं पीठ आणि दुधाच्या मिश्रणाचा चांगला फायदा होऊ शकतो. यात एक चमचा सातुचं पीठ घेऊन त्यात एक चमचा दूध व काही थेंब लिंबूचा रस टाकावा. या तिन्हीचं मिश्रण करून पेस्ट तयार करावी. 15 ते 20 मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवावी. चेहऱ्यावर पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने ही पेस्ट धुवावी. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या 5 भाज्या आहेत सर्वोत्तम; आहारात घ्या डाळीचं पीठ आणि हळद डाळीचं पीठ आणि हळदीमुळे त्वचा उजळते. एक चमचा डाळीचं पीठ घेऊन त्यात चिमूटभर हळद टाका. चेहऱ्यावर ज्या भागात केस जास्त आहेत तिथं ही पेस्ट लावा. नियमित जर चेहऱ्यावर या पेस्टचा वापर केला तर चेहऱ्यावरील अनावश्यक केस निघून जातील. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी दरवेळी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. शिवाय खर्चही अधिक होऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपाय करून वेळ व पैशांची बचत आपल्याला करता येईल. परंतु, कुठलेही उपाय करताना गरज असल्यास वैद्यकीय सल्लाही घ्यायला हवा.
First published:

Tags: Beauty tips

पुढील बातम्या