सतेज त्वचेसाठी काय करायचं?

सतेज त्वचेसाठी काय करायचं?

शरीरावरील स्ट्रेच मार्क्स आणि डाग यापासून सुटका हवी असेल तर अनेक घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणं फार महत्त्वाचं आहे.

  • Share this:

05 एप्रिल : सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी प्रत्येक स्त्रीला आपल्या शरीरावर एकही डाग किंवा कसली खूण नसावी असं मनापासून वाटतं. कितीही प्रयत्न केले तरी डाग किंवा शरीरावरील स्ट्रेच मार्क्स सहसा जात नाहीत. शरीरावरील स्ट्रेच मार्क्स आणि डाग यापासून सुटका हवी असेल तर अनेक घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणं फार महत्त्वाचं आहे.

पाहूया काही घरगुती उपाय

1. दिवसातून रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीरावरील डाग आणि स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होऊ शकते.

2. एलोवेरा जेलने शरीरावरील स्ट्रेच मार्क्सवर मसाज केल्याने त्वचा उजळते. तसंच खराब त्वचा नष्ट होते.

3. त्वचा निरोगी राहण्यासाठी विटामिन सी आणि ई फार गरजेच असतं. पालक, गाजर, फरसबी, हिरव्या भाज्या, स्ट्रॉबेरी, बदाम यासारखं हेल्दी फुड नेहमीच्या जेवणात असेल तर त्वचा सतेज राहते.

4. लिंबाचा रस शरीरावरील स्ट्रेच मार्क्सवर दहा मिनिटापर्यंत लावून ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे स्ट्रेच मार्क्सपासून सुटका होईल.

5. नियमित व्यायाम शरीरासाठी फायदेशीर असतो. सततच्या व्यायामामुळे शरीरावरील निशाण हळूहळू कमी होतात.

6. चांगल्या कंपनीचे क्रीम्स आणि मॉश्चराइजर वापरणं देखील फार महत्त्वाचं आहे. तसंच लोशनचा वापर केल्यास त्याचा शरीरावरील डागांवर चांगला प्रभाव होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 01:59 PM IST

ताज्या बातम्या