S M L
Football World Cup 2018

कोंड्याच्या समस्या असतील तर 'या' खास टिप्स

डीचा महिना तसा खुप मजेशीर असतो. पण तो येताना काही त्वचेच्या समस्या देखील घेऊन येतो. त्यातील एक समस्या म्हणजे कोरडी त्वचा.

Sachin Salve | Updated On: Jan 17, 2018 04:45 PM IST

कोंड्याच्या समस्या असतील तर 'या' खास टिप्स

16 जानेवारी : थंडीचा महिना तसा खुप मजेशीर असतो. पण तो येताना काही त्वचेच्या समस्या देखील घेऊन येतो. त्यातील एक समस्या म्हणजे कोरडी त्वचा. ही समस्या आपल्याला डोक्याच्या त्वचेवर देखील जाणवते, ज्याला आपण कोंडा असे म्हणतो. कोंडा झाला की डोक्याला खाज येणे, रॅशेज येणे असे त्रास होतात. डोक्यातील कोंड्यापासून बचाव करण्यासाठी लोक खुप उपाय करतात, तो नाहीसा होण्यासाठी खुप पैसे देखील खर्च करतात.

त्यामुळे पाहुयात यावर काही उपचार...

1) केसांना शॅम्पू आणि कंडिशनर केल्यानंतर केसांना अॅपल साइडर व्हिनगरचे दोन-तीन थेंब पाण्यात मिसळून ते केसांना लावावे. व्हिनगरमध्ये जास्त प्रमाणात पोट्याशिअम असतं आणि ते कोरड्या त्वचेला मुलायम करण्यासाठी मदत करतं. केमिकल व्हिनगरपासून सांभाळून राहा, ते केसांसाठी हानिकारक असते.

2) कडुलिंबाचा पाला अर्धा तास पाण्यात उकळवून घ्या. त्या पाल्याचा लेप तयार करुन तो डोक्याला लावा. चाळीस मिनिटे डोक्याला तो लेप लावून ठेवा नंतर केस पाण्याणे धुवून घ्या.

3) मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यांना मिक्सरमध्ये वाटून घ्या, त्याचा लेप तयार करा तो डोक्याला लावून घ्या आणि कोमट पाण्याने ते धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा लेप लावा. महिनाभर जरी असं केलं तरी त्याने कोंडा निघून जाईल.

4) कोरफडमध्ये जीवाणू आणि बुरशींशी लढण्याची क्षमता आहे. कोंडा घालवण्यासाठी कोरफड उपयोगी ठरते. कोरफड चाळीस मिनिटांसाठी डोक्याला लावून ठेवा. नंतर शॅम्पू लावून केस धुवून घ्या, यानं कोंडा नाहीसा होतो.

5) ऑलिव्ह ऑइलमध्ये त्वचेच्या शुद्धतेचे नैसर्गिक गुणधर्म समाविष्ट आहेत. याने कोंडा सहज निघून जातो. आठवड्यातून कमीतकमी एक-दोन वेळा डोक्याला मसाज करून घ्यावा, मसाजनंतर डोक्याला एक कपडा बांधून घ्या. जेणेकरून त्वचा ऑलिव्ह ऑइल चांगल शोषून घेईल.

6) पाणी हे सर्व आजारांवर जबरदस्त उपायकारक आहे. त्वचेला पाण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2018 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close