मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Lockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय? या 7 गोष्टी करून पाहा

Lockdown मध्ये वाढलेलं वजन कमी करायचंय? या 7 गोष्टी करून पाहा

Lockdown च्या काळात अनेकांचं वजन वाढलं आहे. आता बाहेरचे पदार्थ न खाताही वाढलेलं वजन कमी कसं करायचं हेच समजेनासं झालं आहे. हे तुमच्या बाबतीतही झालं असेल तर या 7 गोष्टी तुमच्याचसाठी आहेत.

Lockdown च्या काळात अनेकांचं वजन वाढलं आहे. आता बाहेरचे पदार्थ न खाताही वाढलेलं वजन कमी कसं करायचं हेच समजेनासं झालं आहे. हे तुमच्या बाबतीतही झालं असेल तर या 7 गोष्टी तुमच्याचसाठी आहेत.

Lockdown च्या काळात अनेकांचं वजन वाढलं आहे. आता बाहेरचे पदार्थ न खाताही वाढलेलं वजन कमी कसं करायचं हेच समजेनासं झालं आहे. हे तुमच्या बाबतीतही झालं असेल तर या 7 गोष्टी तुमच्याचसाठी आहेत.

    सहा महिन्यांपूर्वी जगाचे व्यवहार कमी होत गेले आणि Coronavirus ने जणू जगच थांबवलं. सुरक्षित राहण्यासाठी घरी बसण्याची वेळ आली आणि अर्थातच व्यायाम, फिरणं कमी झालं. Lockdown च्या काळात अनेकांचं वजन वाढलं आहे. आता बाहेरचे पदार्थ न खाताही वाढलेलं वजन कमी कसं करायचं हेच समजेनासं झालं आहे. तुम्हीही याच अवस्थेत असाल तर हा लेख तुमच्याचसाठी. वजन कमी करण्यासाठी  हवा योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम. पण या गोष्टी माहीत असूनही अंगवळणी पडत नाहीत आणि केल्या असं वाटलं तरी वजन काही कमी होत नाही. का होतं असं? योग्य आहार, नियमित व्यायाम म्हणजे किती आणि हे रूटीन अंगवळणी पडण्यासाठी काय करायचं? फक्त या 7 गोष्टींकडे लक्ष दिलत तर नक्कीच वजन कमी करणं कठीण वाटणार नाही. निरोगी जीवनशैलीसह आहाराचं योग्य नियोजन ही  वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. कमी स्वरूपात पण सातत्यपूर्वक प्रयत्न आणि दिनक्रमातील बदल वजन कमी प्रभावीपणे  मदत करतील. 1. नियमित व्यायाम करा... घरातही व्यायाम होऊच शकतो. आपल्याला घाम गाळूनच शारीरिक स्वास्थ्य कमवायचं आहे. वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबसाईट्सवर घरच्या घरी करायचे असंख्य व्यायाम प्रकार दिले आहेत. नियमित व्यायाम करा. 2. आठवड्याचा फूडचार्ट बनवा... बरेचदा आपल्याला पौष्टिक खायचं असतं पण आपण अरबट-चरबट खातो. त्यासाठी आठवड्याच्या आहाराचं नियोजन करा आणि स्वयंपाकघरात आवश्यक किराणा सामान आहे ना याची खात्री करून घ्या. 3. जंक फूड नियंत्रित ठेवा... हॉटेल्समध्ये खाणं बंद झालं असलं, तरी फ्रोजन फूड, इन्स्टंट फूड, घरच्या घरी केलेला केक, बिस्किटं याचा खुराक बंद झालेला नाही. त्यामुळे तुम्ही हे पदार्थ किती खाताय याकडे लक्ष ठेवा. 4. रात्रीचं जेवण वेळेवर करा... रात्रीचं जेवण लवकर जेवल्याने अन्न योग्य वेळेत पचतं आणि तुम्हाला चांगली झोप मिळेल. हा उपाय नक्की करून पाहा. 5. सकाळ चहा घेता की कॉफी? आपल्या दिवसाची सुरुवात या दोन्हीपैकी कशानेही करू नका. त्याऐवजी  कोमट पाण्यात लिंबू, मध घालून प्या. दिवसाची सुरुवात निश्चित चांगली होईल आणि दिवसभर पचनक्रिया चांगली राहील. 6. हळू हळू जेवा एक घास 32 वेळा चावून खावा, असं सांगतात. तुम्हाला जेवायला किती वेळ लागतो यावरून तुमचं वजन कमी होणार की नाही हे ठरू शकतं. एकदम सगळे पदार्थ वाढून न घेता, हवं तेवढं पानात घेऊन सावकाश आस्वाद घेत जेवा. आपोपाप भूक असेल तेवढं खाल्लं जाईल आणि व्यवस्थित पचन होईल. भराभर जेवताना अतिरिक्त खाणं होतं आणि त्यामुळे वजन वाढतच राहतं. 7. वजनाच्या प्रमाणात पाणी हवं तुमच्या वजनाला (किलोग्रॅममधला आकडा) 30 ने भागा आणि जेवढा आकडा येईल तेवढं लीटर पाणी दररोज गेलंच पाहिजे, हे ध्यान्यात घ्या. पुरेसं पाणी प्यायल्याने जास्तीचं अन्न जात नाही आणि चांगलं पचनही होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Health, Weight loss

    पुढील बातम्या